PM Narendra Modi, Shirdi saam tv
मुंबई/पुणे

PM Modi To Visit Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र माेदी उद्या शिर्डीत, साईभक्तांसाठी महत्त्वाची सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीतील विविध विकास कामांचे लोकार्पण हाेणार आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Shirdi News : पंतप्रधान नरेंद्र माेदी (pm narendra modi) उद्या (गुरुवार) शिर्डी दाै-यावर येत असून ते साई समाधीचे दर्शन घेणार आहेत. पंतप्रधान माेदी यांच्या शिर्डीतील दाै-यामुळे साई समाधी दर्शन भाविकांसाठी सुमारे अर्धा तास बंद राहील अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.  (Maharashtra News)

मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर म्हणाले उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साई समाधीचे दर्शन घेणार आहेत. माेदी हे दुपारी १ नंतर मंदिरात येतील. त्यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा आणि 'शिर्डी माझे पंढरपूर' आरती हाेईल.

त्यानंतर साईबाबा संस्थानच्या सन २०२४ च्या डायरीचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते प्रकाशन हाेईल. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा सत्कार केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदी दर्शनाला पोहचल्यानंतर सामान्य भाविकांना साईबाबा समाधी दर्शन अर्धा तास बंद राहणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली. दरम्यान यावेळी दर्शन रांगेत भक्तांना अर्धा तास बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतरिक्त साई दर्शन नियमितपणे सुरू राहणार असल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT