Lasalgaon Bazar Samiti : आता बस्स करा !कांद्याच्या भावात केंद्र शासनाने हस्तक्षेप करू नये; शेतक-यांची मागणी

कांद्याचा दर सुधारत असल्याने शेतकरी सुखावला आहे.
onion
onionsaam tv
Published On

- अजय सोनवणे

Lasalgaon Bazar Samiti News : लासलगाव बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कांद्याला भाव मिळत असल्याने केंद्र शासनाने यात आता हस्तक्षेप करू नये असे मत शेतकरी व्यक्त करु लागले आहेत. (Maharashtra News)

onion
Nilwande Dam : ५० वर्षांनंतर गावांत पाणी आले, ग्रामस्थ आनंदले; पंतप्रधानांच्या हस्ते हाेणार पूजन

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या भावात चांगली सुधारणा होऊन प्रति क्विंटल कमीतकमी 3000 रुपये, जास्तीतजास्त 4551रुपये तर सरासरी 4200 रुपये इतका भाव मिळाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या कांद्याची आवक कमी होत असल्यामुळे भाव टिकून आहे. दोन महिन्यांपूर्वी कांद्याला कवडीमोल भाव मिळाला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना उकिरड्यावर कांदा फेकून देण्याची वेळ आली होती.

आता भावात चांगली सुधारणा झाली आहे. यामुळे शेतक-यांना दिलासा मिळत असून केंद्र शासनाने यात आता हस्तक्षेप करू नये असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

आजचे (बुधवार, ता. 25) कांदा भाव

जास्तीत - 4551 रुपये

कमी -3000 रुपये

सरासरी - 4200 रुपये

Edited By : Siddharth Latkar

onion
Maharashtra CM : ...तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील, आम्ही ते मान्य करु : चंद्रशेखर बावनकुळे (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com