PM Narendra Modi  Saamtv
मुंबई/पुणे

PM Modi Speech: 'विकसित देशाचे केंद्रस्थान पुणे..', पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन; नव्या मेट्रो मार्गिकेचे केलं लोकार्पण

PM Modi Pune Metro Inauguration: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. २९ सप्टेंबर

PM Modi Speech Pune Metro Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. २६ सप्टेंबर रोजी निश्चित झालेला मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता. आज दुपारी पंतप्रधान मोदींनी ऑनलाईन उपस्थितीत राहून प्रतीक्षेत असलेला जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गाचे लोकार्पण केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी लाईव्ह संवाद साधताना मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

'पुण्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना माझा नमस्कार. दोन दिवसांपूर्वी मला पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच लोकार्पण करण्यासाठी यायचं होते. मात्र पावसामुळे तो कार्यक्रम रद्द झाला. त्यात माझे नुकसान झाले. पुणे शहराच्या कणाकणात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती आहे. अशा पुण्यामध्ये येताना ऊर्जा मिळते. पुण्याची धरती महान विभूतींची आहे. ही धरती महाराष्ट्राच्या विकासाची नवी साक्षीदार होत आहे,' असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

'स्वारगेट मार्गावर मेट्रो धावायला लागेल. सावित्रीबाई यांचे स्मारक याचे सुद्धा आज भूमिपूजन करण्यात आले. विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना फळ मिळालं आहे, कारण सोलापूर विमानतळ कार्यरत होत आहे. पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आता लोकं थेट सोलापूरला विमानाने जाऊ शकतात. महाराष्ट्र राज्याला नवीन ध्येच ठेवण्याची गरज आहे. आज पुणे ज्या वेगाने वाढते आहे त्यात पुण्याची लोकसंख्या वाढतेय या लोकसंख्याच सामर्थ्य वाढवण्याची गरज आहे.महायुतीची सरकार हाच विचार घेऊन दिवस रात्र काम करत आहे,' असं पंतप्रधान म्हणाले.

'पुण्याची आधुनिकता पाहता आधीपासूनच काम करायची गरज होती. मेट्रो आधीच यायला हवी होती पण दुर्दैवी आहे की शहरात प्लॅनिंग आणि व्हिजन या गोष्टीचा आभाव राहिला. कुठल्या ही योजना आल्या तर फाईल अडकून राहिल्या याच नुकसान पुण्याला सुद्धा झालं. पुण्यात मेट्रो बनवण्याचे २००८ मध्ये ठरले होते पण २०१६ मध्ये आम्ही काम करण्याचा निर्णय घेतला. मागच्या सरकारने तर मेट्रोचा एक पिलर बांधले नाही. डबल इंजिन सरकार आधी अनेक प्रकल्पांना उशीर झाला होता. आता एक लक्ष ठेऊन पुढे जायचं आहे, विकसित महाराष्ट्र, विकसित देशाचे केंद्र पुणे राहणार..' असा विश्वासही यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रुपाली चाकणकर यांनी बटेंगे तो कटेंगे वादावरून भाजपला घराचा आहेर

Viral Video: वाह! काटा लगा गाण्यावर लोकलमध्ये प्रवाशांची जुगलबंदी, आजोबांनाही केला हटके डान्स; पाहा व्हिडिओ

Maharashtra Election : संभाजीनगरमध्ये सोन्याची गाडी सापडली, १९ कोटींचं घबाड जप्त!

Gajkesari Yog: गुरु चंद्राच्या युतीने बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळणार डबल इनकम; आयुष्यात होणार धनवृष्टी

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT