Maharashtra Election : संभाजीनगरमध्ये सोन्याची गाडी सापडली, १९ कोटींचं घबाड जप्त!

Maharashtra Election Latest News : सिल्लोडमध्ये पोलिसांनी नाकाबंदीवेळी चक्क सोन्या-चांदीने भरलेली गाडी जप्त केली आहे.
chhatrapati sambhaji nagar sillod police seized gold and silver van
chhatrapati sambhaji nagar sillod police seized gold and silver van chhatrapati sambhaji nagar sillod police seized gold and silver van
Published On

Maharashtra Election News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नाकाबंदीवेळी पोलिसांनी सोनं-चांदीने भरलेली गाडी जप्त केली आहे. या गाडीमध्ये तब्बल १९ कोटी रुपयांच्या किंमतीचे सोनं-चांदी असल्याचं समोर आलेय. गुरुवारी रात्री पोलिसांनी सिल्लोडमध्ये मोठी कारवाई केली. सोन्याची ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून चौकशी सुरु आहे. गाडी कुणाची आहे? सोनं कुणाचं आहे, याबाबत चौकशी सुरु आहे.

सिल्लोड येथील निवडणूक तपासणी पथकाने संभाजीनगरहून जळगावकडे जाणाऱ्या वाहनातून जवळपास १९ कोटी रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाट्यावरील चेकपोस्टवर करण्यात आली. सिल्लोड येथील स्थिर पथकाच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या एका वाहनाची तपासणी केली. तेव्हा पथकाला यात सोन्या चांदीचे १९ कोटी रुपयांचे दागिने सापडले.

सिल्लोडमध्ये जप्त करण्यात आलेले हे दागिने जळगाव येथील एका नामांकित सराफा ज्वेलर्सचे असल्याची माहिती गटविकास अधिकारी आहिरे यांनी दिली. हे दागिने स्थिर पथकाने जप्त करून जीएसटी पथकाच्या स्वाधीन केले आहे. हे दागिने कोणत्या ज्वेलर्सचे आहे, कोठे नेले जात होते, त्याचे पक्के बिल होते का, याची माहिती मिळू शकली नाही. पथकाने हे वाहन निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्या ताब्यात दिले.

अमरावतीमध्ये ५ कोटींचे सोने व १७ लाखांची चांदी जप्त

अमरावतीच्या नागपुरी गेट चौकातून दर्यापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका वाहनातून नागपुरी गेट पोलिसांनी पाच कोटींच्या वर सोने व 17 लाखांपर्यंत चांदी असलेले वाहन ताब्यात घेतले आहे. सिक्वेल ग्लोबल प्रेशियस लॉजिस्टिक या कंपनीचे हे वाहन दर्यापूर वरून अकोल्याच्या दिशेने जात असल्याची माहिती नागपुरी गेट पोलिसांकडून देण्यात आली आहे. येवढ्या मोठ्या प्रमाणात सोने व चांदी नेमके कुठे जात होते या संदर्भातील अधिक तपास नागपुर गेट पोलीस करत आहे. कालच अमरावती शहरात अडीच कोटी रुपयांची रोख दोन वाहनातून पोलिसांनी जप्त केली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात रोकड सोन्या-चांदीची वाहतूक होत असल्याचं पुढे येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com