PM Narendra Modi Pune Sabha  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Traffic diversion for PM Modi rally : PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

PM Modi Pune Sabha: मोदींची पुण्यातील सभा गर्दीचे विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन पोलिसांनी पुण्यातील रस्ते वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.

Satish Daud

PM Narendra Modi Pune Sabha

पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी पुण्यात सभा घेणार आहे. शहरातील रेसकोर्स मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेसाठी भाजप आणि मित्रपक्षांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींची पुण्यातील सभा गर्दीचे विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे.

या सभेसाठी दीड ते दोन लाख नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 35 हजार लोकांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. हीच बाब लक्षात घेऊन पोलिसांनी पुण्यातील रस्ते वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे शहरातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुण्यात मेट्रो प्रकल्प, शहरातील विविध विकासकामांचे उद्‌घाटन सोहळ्यानिमित्त मागील वर्षभरात मोदींनी दोन वेळा दौरे केले आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर येत आहेत.

मोदींच्या सभेनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त शहरातील वाहतुकीत आज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

  • रेसकोर्स परिसरातील पाण्याची टाकी ते टर्फ क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे.

  • टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहील.

  • सोलापूर रस्त्यावरील अर्जुन रस्ता जंक्शन ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता बंद राहील.

  • बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहील.

पुणेकरांसाठी पर्यायी मार्ग कोणते?

  • मम्मादेवी जंक्शन येथून व बेऊर रस्ता जंक्शन येथून इच्छित स्थळी.

  • खालील रस्ते तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.

  • गोळीबार मैदान ते भैरोबानाला (सोलापूर रस्ता)

  • गोळीबार मैदान चौक लुल्लानगर ते इच्छित स्थळी.

  • भैरोबानाला ते गोळीबार मैदान चौक (सोलापूर रस्ता)

  • पुणेकरांना पर्यायी मार्ग दिले आहेत त्याच आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICICI बँकेचा ग्राहकांना जबर दणका, अर्धा लाख रूपये मिनिमम बॅलेन्स ठेवावा लागणार

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरणार, शिंदेंसेनेची उद्या नाशिकमध्ये बैठक

Crime: बीडमध्ये रक्तरंजित थरार, नशेखोर तरुणाचा कुटुंबीयांवर चाकूहल्ला; आजीचा मृत्यू, आई-वडील गंभीर

Jitendra Awhad: 'बिहार,महाराष्ट्राच्या मतदार याद्या गायब'; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

Vande Bharat : पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचा आज शुभारंभ; प्रवासाचा वेळ 3 तासांनी कमी!

SCROLL FOR NEXT