PM Narendra Modi Saam Tv
मुंबई/पुणे

PM Narendra Modi Mumbai Visit: मोदींच्या दौऱ्याआधी मुंबईत जोरदार तयारी; छोटी घर दिसू नयेत म्हणून लावले पांढरे पडदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत.

Gangappa Pujari

PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenrda Modi) आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मरोळमध्ये मुंबई महानगरपालिका (BMC) आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळ झाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी CSMT येथून वंदे भारत ट्रेनला आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर CSMT च्या बाजूच्या परिसरात सामान्य लोकांची छोटी घर दिसू नयेत म्हणून पांढऱ्या रंगाचे पडदे लावण्यात आले होते. माध्यमांनी आवाज उठवताच हे पडदे पालिकेकडून हटवण्यात आले आहेत.

असा असेल पंतप्रधानांचा मुंबई दौरा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 2.45 वाजता सीएसएमटी स्थानकावर पोहोचतील. ते प्लॅटफॉर्म अठरावर दोन मिनिटांसाठी चालत वंदे भारतच्या ट्रेनकडे जाणार आहेत. वंदे भारतमध्ये लहान मुलांसोबत 7 मिनिट मोदी गप्पा मारतील. ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील, साधारणता 3 मिनिटांचा हा कार्यक्रम असेल. मोदींना 1 मिनिटांचं यासंदर्भात प्रेसेंटेशन दिलं जाईल.

मोदी त्यानंतर प्लॅटफॉर्म 18 वरून वाहनाच्या दिशेने 2 मिनिटात पोहोचतील आणि तिथून आयएनएस शिक्रावरतीदाखल होतील. सीएसएसटी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर 18 वरती हा साधारणता 15 मिनिटांचा हा कार्यक्रम असेल. (Latest Maratji News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT