Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. पंंतप्रधानांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे जल्लोशात स्वागत केले.
यावेळी बीकेसी मैदानावर सुरू असलेल्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिकास्त्र सोडले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) कौतुकही केले.
महाविकास आघाडीवर टिकास्त्र..
यावेळी बोलताना ,"ज्या ज्या योजनेचे भूमिपूजन केले ते तुमच्या हस्ते उदघाटन होत आहे. कोविड काळात मोदींनी पान टपरी वाले, फेरीवाले यांच्यासाठी निधीची तरतूद केली पण मविआ सरकारने ती योजना लागू केली नाही. पण आम्ही सतेत आल्यानंतर 1 लाख फेरीवाले, फुटपाथ वाल्यांना मदत करत आहोत" असे फडणवीस (Devendra Fadanvis) यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंवरही टीका..
त्याचबरोबर राज्यात डबल इंजिन सरकार आले होते पण काही लोकांनी बेईमानी केली, त्यामुळे सरकार बनले नाही मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्य्या शिवसैनिकासोबत पुन्हा सत्ता आली, अशी टीकही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
"3 वर्ष मुंबई महानगर पालिकेत काम केले नाही कारण पालिकेचे यांच्यासोबत हिस्सेदारी जमत नव्हती पण शिंदे मुख्यमंत्री झाले आणि कामांना गती मिळाली. दरवर्षी तेच तेच रस्ते आपण पाहत होतो,पण मुख्यमंत्री यांनी रस्ते सिमेंटचे करण्याचा निर्णय घेतला त्याचे देखील आज लोकापर्ण होणार आहे," असे म्हणत त्यांंनी एकनाथ शिंदेंचे कौतुकही केले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही यावेळी बोलताना राज्यात मोठमोठे प्रकल्प येणार असल्याचे सांगत येणाऱ्या काळात मुंबई पालिकेत झालेला विकास पाहायला मिळेल, अशी ग्वाही दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.