'गेल्या १० वर्षांत भारत बदलला. दहा वर्षांपूर्वी घोटाळ्यांची चर्चा व्हायची. आता देशात विकासाची चर्चा होते, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधत देशातील नागरिकांना विकासाची गॅरंटी दिली. (Latest Marathi News)
मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू, बेलापूर ते उरण रेल्वे, दिघा रेल्वे स्टेशन यासहित इतर विविध कामांचं लोकार्पण आज शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या लोकार्पणानंतर नवी मुंबईतील एका आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी देशात केलेल्या विकासाच्या कामांचा दाखला दिली. तसेच यावेळी बोलताना विरोधकांवर टीकाही केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'मी तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करत म्हटलं होतं की, देश बदलेल. देश पुढे देखील जाईल. ज्या व्यवस्थेत काम रखडलं जायचं. जुन्या व्यवस्थेत देशातील अनेक कामांचं रखडलं होतं. तेव्हा मोदींची गॅरंटी होती, असे ते पुढे म्हणाले.
'आमच्यासाठी अनेक प्रकल्प भारताच्या नव्या निर्माणासाठी असतात. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ते अजित पवार यांच्यापर्यंतच्या टीमचा प्रयत्नाचं हे यश आहे, असे मोदी म्हणाले.
'देशातील महिलांच्या सशक्तीकरणाची गॅरंटी दिली आहे. विकसित भारताच्या निर्माणासाठी महिलांचं पुढे येणे तितकंच म्हत्वाचं आहे. महिलाच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याचं आमचं असणार आहे. त्यांचं जीवन सोपे करण्याचा मानस आहे. उज्ज्वला गॅस सिलिंडर, आयुष्मान योजना, जनधन योजना, पीएम आवास योजना, गरोदर महिलांच्या खात्यात ६ हजार रुपये देण्याची योजना, सुकन्या योजना. आम्ही महिलांच्या विकासावर भर दिला आहे,असे नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.
'नरेंद्र मोदी हे जगात सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत. त्यांनी अटल सेतूचे भूमिपूजन आणि अटल सेतूचे लोकार्पणही केले. आज स्वप्नपूर्तीचा दिवस आहे, असेही फडणवीस म्हणाले
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.