PM Narendra Modi News Saam tv
मुंबई/पुणे

PM Narendra Modi in France: मोठी बातमी! फ्रान्स दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींची विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा

PM Narendra Modi News: पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्समध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे.

Vishal Gangurde

New Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्समध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. अनिवासी भारतीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेनंतर आता दोन दिवसीय फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. तसेच पॅरिस येथील अनिवासी भारतीयांसोबत बोलताना मोठी घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'मी आपल्याला आनंदाची बातमी देत आहे की, आम्ही शिक्षणाचाही मान ठेवला आहे. भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवणं आता सोपं करण्यात आलं आहे. तर गेल्या वर्षी मी ठरवलं होतं की, फ्रान्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा उच्चशिक्षणाचा व्हिसा देण्यात येत होता'.

'आता फ्रान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना दीर्घकालीन पाच वर्षांचा व्हिसा देण्यात येणार आहे, अशी मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेमुळे फ्रान्समध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचा सर्वाोच्च नागरी पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पीएम मोदींना फ्रान्स सरकारने 'ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा फ्रान्समधील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पीएम मोदी हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते पीएम मोदींना 'ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा परिणाम, EWS प्रवेशाला फटका, 'SEBC'कडे विद्यार्थ्यांचा वाढता कल

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Zohran Mamdani: अमेरिकेत राजकीय उलथापालथ, भारतीय वंशाच्या नेत्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार धक्का, नेमकं प्रकरण काय?

Success Story : कोरडवाहू शेतकर्‍याचा मुलगा झाला अधिकारी! MPSC मध्ये महाराष्ट्रात टॉप १० मध्ये, अख्खा गावात जल्लोष

Plane Crash : उड्डाण घेताच विमान कोसळले, ४ जणांचा मृत्यू; काळाकुट्ट धूर अन् आगीचे उंच लोळ, थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT