PM Narendra Modi And NCP Chief Sharad Pawar  saam tv
मुंबई/पुणे

PM Modi And Sharad Pawar: PM मोदी आणि शरद पवार येणार एकाच मंचावर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Lokmanya Tilak National Award Program: पुण्यात होणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यानिमित्त हे दोघे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पीएम मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यामध्ये जय्यत तयारी सुरु आहे. पीएम मोदींच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यादरम्यान पीएम मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. पुण्यात होणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) सोहळ्यानिमित्त हे दोघे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यातील प्रमुख नेते जाहीर कार्यक्रमात प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता दिसत आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे पीएम मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार हे प्रमुख पाहुणे असतील.शरद पवार यांच्या हस्ते पीएम मोदींना पुरस्कार देण्यात येणार आहे.

2015 मध्ये बारामतीत झालेल्या एका कार्यक्रमात पीएम मोदी आणि शरद पवार एकत्र आले होते. तब्बल आठ वर्षांनी हे दोन्ही ज्येष्ठ नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम जरी पुरस्कार सोहळा असला तरी सुद्धा या कार्यक्रमादरम्यान काही राजकीय खलबत्त घडतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे (Lokmanya Tilak Trust) लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक पुरस्काराचे (Lokmanya Tilak Award) वितरण केले जाणार आहे. यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पीएम मोदी हे पुण्यामध्ये येणार आहेत. यावेळी ते मेट्रो ट्रेनच्या विस्तारीत मार्गाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्याचसोबत पुणे महानगर पालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पीएमआरडीए या अंतर्गत विकास प्रकल्पांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT