PM Modi Pune Tour Saam Tv
मुंबई/पुणे

PM Modi Pune Visit: PM मोदी पुणे दौऱ्यावर, कार्यक्रम स्थळाचा परिसर नो 'फ्लाईंग झोन' घोषित; विरोधक आंदोलन करण्याच्या तयारीत

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार आहे.

Shivani Tichkule

PM Modi News: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी स.पा. महाविद्यालय आणि पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मोठा मंडप टाकला जात आहे. तर सुरक्षेच्या करणास्थाव ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कार्यक्रम स्थळाचा परिसर नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

परंतु त्यांच्या या दौऱ्यात विरोधी पक्ष आक्रमक होणार आहेत. सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येत पंतप्रधानांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात आज काँग्रेस भवन येथे विरोधकांची बैठक होणार आहे. एक तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे (Pune) दौऱ्यावर येत असून त्यांना विरोध करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच बाबा आढाव हे देखील या बैठकीत सामील होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन होण्याची शक्यता आहे.

इंडिया फ्रंटने दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याचा १ तारखेला सकाळी ११ वाजता अलका चौकात काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे. तसेच पुणेकरांनी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन इंडिया फ्रंटच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मणिपूरमध्ये (Manipur Violence) जाऊन परिस्थिती पाहावी आणि चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.

असा असेल दौरा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रम आणि विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ‘श्रीं’च्या मूर्तीला अभिषेक करणार आहेत. त्यानंतर लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: मुंबईत पावसाचा जोर ओसरला, राज्यात अतिमुसळधार, अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा हवामानाचा अंदाज

Horoscope: वाहन खरेदी अन् आर्थिक लाभाचा योग; बुधवार ठरेल भाग्य चमकवणारा दिवस, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

शिवसेना आमदाराच्या पत्नीसमोर चित्रलेखा पाटील म्हणाल्या ५० खोके...; सुरूवातीला बाचाबाची नंतर धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Ban Online Betting Games: मोदी सरकारचा आणखी एक स्ट्राईक; ऑनलाइन बेटिंग गेम्सवर आणणार बंदी

Crime: दारूच्या नशेत बायकोवर कुऱ्हाडीने वार, नंतर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; जळगाव हादरले

SCROLL FOR NEXT