Railway Platform Ticket Latest Rates Saam Tv
मुंबई/पुणे

Railway Platform Ticket : मुंबईत प्लॅटफॉर्म तिकीट महागले; जाणून घ्या नवे दर

Platform Ticket Latest Rates: मुंबई सीएसटी आणि काही उपनगरीय रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म तिकीट महागले आहे. ही दरवाढ १५ दिवसांपर्यंत असेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईत रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट महागले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय मंडळाने प्लॅटफॉर्मचे तिकीट दर वाढवले आहेत. उन्हाळ्यात (Summer) रेल्वे प्रवाशांची वाढत असते. यावेळी रेल्वे स्थानकांवर (Railway Platform) प्रचंड गर्दी होत असते. अशात अनेक प्रवाशी कारण नसतानाही रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभे असतात. त्याचप्रमाणे गर्दाच्या वेळी रेल्वेच्या अलार्म चेन पुलिंगमध्येही वाढ झाली आहे. हे सर्व रोखण्यासाठीच रेल्वेने प्लॅटफॉर्मच्या तिकीट दरांमध्ये वाढ झाली आहे. (Platform tickets more expensive in Mumbai see new rates of railway platform ticket)

हे देखील पाहा -

मध्य रेल्वेच्या मुंबई (Mumbai) विभागीय मंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (Chief Public Relations Officer, Central Railway, Mumbai) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या नोटीसमध्ये लिहीलंय की, रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि अलार्म चेन पुलिंगचा (alarm chain pulling) गैरवापर रोखण्यासाठी मध्य रेल्वेने ९ मे पासून ते २३ मे पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवले आहेत. त्यानुसार आता प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये केले आहेत. मुंबई आणि इतर काही रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म तिकीट महागले आहे. ही दरवाढ १५ दिवसांपर्यंत असेल.

या स्थानंकावर रेल्वे तिकीट महागले

मध्य रेल्वेने (Central Railway) मुंबई आणि मुंबई उपनगरांतर्गत येणाऱ्या एकूण सहा रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्लॅटफॉर्मचे तिकीट दर वाढवले आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर स्टेशन, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या ६ स्थानकांवर सोमवारपासून (९ मे पासून) येत्या २३ तारखेपर्यंत म्हणजेच १५ दिवसांसाठी प्लॅटफॉर्म तिकीट दरात तात्पुरती वाढ केली आहे.

अलार्म चेन पुलिंगच्या घटनांमध्ये वाढ

मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्मचे तिकीट दर वाढवण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे गेल्या काही दिवसात वाढलेल्या चेन पुलिंगच्या घटना. मागील महिन्यात अलार्म चेन पुलिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

गेल्या महिन्यात मुंबई विभागात अलार्म चेन पुलिंगच्या एकूण ३३२ प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी ५३ प्रकरणे वैध कारणांवर आधारित नोंदवण्यात आली होती, तर २७९ प्रकरणांमध्ये वैध कारणे नाहीत.
शिवाजी सुतार - मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

पुरेशा किंवा वैध कारणाशिवाय अलार्म चेन खेचल्याबद्दल रेल्वे कायद्याच्या तरतुदींनुसार तब्बल १८८ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे आणि ९४,००० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी अनावश्यक आणि शुल्लक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगचा अवलंब करू नये कारण यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

Maharashtra Live News Update : चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT