saam tv
मुंबई/पुणे

पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन; मिथेनॉलचा मोठा साठा जप्त; IAS तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

Pune Toxic Liquor Bhiwandi Connection: विषारी गावठी दारू प्रकरणी भिवंडी कनेक्शन उघड झाले आहे. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर भिवंडीतील एका कंपनीत धाड टाकण्यात आली.

Akshay Badve

  • एफडीएने भिवंडीत धाड टाकून मोठ्या प्रमाणात मिथेनॉल जप्त केले.

  • गावठी दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचा धक्कादायक खुलासा

  • आयएएस तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर राज्यभर कारवाईला वेग.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूचे सेवन केल्यामुळे २२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या 'मृत्यू तांडवा'नंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत भिवंडी कनेक्शन शोधून काढलंय. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर भिवंडीत मिथेनॉलचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात ३० रुपयांत मिळणारी गावठी दारू प्यायल्याने तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यू तांडवामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार ज्या दारूमुळे २२ जणांचा मृत्यू झाला त्या दारूत 'मिथेनॉल' हे जीवघेणे विषारी रसायन मिसळण्यात आल्याची बाब समोर आली. यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आयएएस तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात मिथेनॉलचा अवैध साठा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर प्रशासनाने भिवंडीत धाड टाकून मिथेनॉलचा साठा जप्त केला आहे.

२२ जणांचा जीव घेणाऱ्या विषारी दारू बनवण्यासाठी ज्या मुख्य केमिकलचा वापर करण्यात आला होता, त्याचा पुरवठा भिवंडीतून झाल्याचे तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर एफडीएच्या विशेष पथकानं भिवंडी परिसरातील 'एका कंपनीच्या गोदामावर अचानक धडक छापा टाकला. या कारवाईत मानवी जिवासाठी अत्यंत घातक असलेल्या 'मिथेनॉल' या विषारी रसायनाचा सुमारे 5,929 किलोग्रॅमचा प्रचंड मोठा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला. पुण्यात विकल्या गेलेल्या दारूच्या भेसळीसाठी मुख्य रसायन याच कंपनीकडून पुरवण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

या अत्यंत विषारी आणि घातक द्रव्याची कोणतीही अधिकृत खरेदी-विक्रीची नोंद किंवा साठा कंपनीच्या नोंदवहीत उपलब्ध नव्हती. दरम्यान धाडीची कारवाई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ठाण्याचे औषध निरीक्षक योगेंद्र पोळ यांनी केली होती. कारवाईच्या वेळी संस्थेचे मालक अरूणकुमार चौबे आणि सक्षम व्यक्ती अभिषेक चौबे हजर नव्हते. अधिक चौकशी केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: या राशींनी कोणताही निर्णय घेताना घाई करू नका; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Friday Horoscope : कामाचा ताण वाढेल; 5 राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

Horoscope Today: 'या' ५ राशींसाठी शुक्रवार अत्यंत शुभ, ग्रहांची मिळणार साथ, पैशांचा पडणार पाऊस

SCROLL FOR NEXT