Mahayuti  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : विधानसभापूर्वीच महायुतीत मोठा वाद; पिंपरीत भाजपचा थेट अजित पवार गटाविरोधात ठराव, काय आहे कारण? VIDEO

pimpri assembly constituency : विधानसभापूर्वीच महायुतीत मोठा वाद झाल्याचे दिसून येत आहे. पिंपरीतील भाजप विरुद्ध अजित पवार गटाच्या वादावर महायुतीचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : आगामी विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच महायुतीत मोठा वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पिंपरी विधानसभेत अजित पवार गटाचा प्रचार करायचा नाही, असा ठराव पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपने केला. पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपने थेट आणदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पिंपरीत भाजपची अजित पवार गटाविरोधात भूमिका

'लोकसभेत भारतीय जनता पक्षाला उमेदवारी मिळाला नाही, आता आम्हाला पिंपरीत भाजपचाच उमेदवार हवा, अशी आग्रही भूमिका भाजपच्या बैठकीत एकमुखाने मांडण्यात आली. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात नाराजी दिसू लागली आहे.

लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही, मग आपण घडाळ्याचा प्रचार का करायचा? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. ठरल्याप्रमाणे ही मागणी महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडे केली जाणार आहे.

विषेश म्हणजे पिंपरी विधानसभा मतदारसंघावर दावा सांगत असताना शिवसेना आणि भाजप नेत्यांनी अजित पवारांचे खंदे समर्थक विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना आणि पर्यायाने अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. यामुळे चिडलेल्या आमदार बनसोडे यांनी दोन्ही पक्षाच्या मागणीवर आपली प्रतिक्रिया देत, ते आमच्या मतदारसंघावर दावा करत असतील तर आम्हीही त्यांच्या मतदारसंघावर दावा करू, असं म्हटलंय.

दरम्यान, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने महायुतीच्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम केले, म्हणून तर मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराला पिंपरीतून मताधिक्य मिळाले असल्याची आठवण करून देत,आमदार बनसोडे यांनी शिवसेना भाजपच्या नेत्यांना आरसा दाखविन्याचाही प्रयत्न केला आहे. पिंपरीत भाजप आणि अजित पवार गटात वाद निर्माण झाल्याने महायुतीचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या सर्व वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय प्रतिक्रिया देतात, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

SCROLL FOR NEXT