‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ पोस्टरची जोरदार चर्चा! काय आहे प्रकरण?  SaamTvnews
मुंबई/पुणे

‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ पोस्टरची जोरदार चर्चा! काय आहे प्रकरण?

याआधी ‘शिवडे, आय एम सॉरी’ अशा पोस्टरने खळबळ माजवली होती. आता सध्या असेच एक बॅनर शहरात झळकत आहे. ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ असे वाक्य लिहिलेले पोस्टर सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेत आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात सध्या एका हटके पोस्टरची जोरदार चर्चा सुरु आहे. याआधीही शहरामध्ये वेगवेगळी वाक्ये लिहलेली अनेक पोस्टर्स लागल्याचे पाहायला मिळाले होते. यातील वाक्यांचा संदर्भ लवकर मिळत नसला तरी त्याची चर्चा जोरदार होते. शहरात फ्लेक्सबाजी काय थांबता थांबत नाहीये. याआधी ‘शिवडे, आय एम सॉरी’ अशा पोस्टरने खळबळ माजवली होती. आता सध्या असेच एक बॅनर शहरात झळकत आहे. ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ असे वाक्य लिहिलेले पोस्टर सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेत आहे. पोस्टर पाहणारा प्रत्येक जण या वाक्यावर विचार करतोय आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. शहरातील नेहरूनगर - यशवंतनगर रस्त्यांवर हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या पोस्टरचे फोटो सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.

हे देखील पहा :

शहरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर लावलेले असे पोस्टर्स नागरिकांचे लक्ष्य वेधून घेत आहेत. त्यामुळे शहरात पोस्टरबाजीची नेहमीच चर्चा सुरु असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय पक्ष प्रचाराची राळ उडवून देत आहेत. तर दुसरीकडे विविध गृहप्रकल्प, विविध व्यावसायिक आपला ब्रँड अल्पावधीत सर्वतोमुखी व्हावा, यासाठी असे उत्कंठावर्धक बॅनर व पोस्टरबाजी करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. परिणामी शहरात हटके फलक लावण्याची ‘क्रेझ’ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या असाच एक बॅनर सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक राजकीय वतुर्ळातदेखील चर्चा रंगली आहे. ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ असा नारा देत एका व्यावसायिकाने जाहिरातबाजी सुरू केली आहे. अशा प्रकारे जाहिरात करून अनेकांची उत्कंठा शिगेला पोचली आहे. कोण आहे, काय असेल, असाच प्रश्‍न अनेकांना पडला आहे. परिणामी, जाहिरातीत वापरण्यात येणाऱ्या व्यक्‍ती, त्यांच्या तोंडी घातलेले वाक्य हा नेहमीच लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील चर्चेतील पोस्टर

पिंपरी-चिंचवड शहरात ‘शिवडे, आय एम सॉरी’ (‘SHIVDE I AM SORRY') या पोस्टरची चर्चा झाली होती. त्यानंतर पिंपरीतील ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा असा मजकूर असलेली पोस्टर व्हायरल झाली होती. त्यावेळी संबंधित फ्लेक्स लावणाऱ्या दुकानदाराने टीका झाल्यावर माफीही मागितली होती. त्यानंतर नगरसेवक रवी लांडगे यांनी ‘हे माझं चुकलं का?’ असे फ्लेक्स भोसरी परिसरात ठिकठिकाणी लावून पक्षांतर्गत कलह उघड केला होता.

त्यामुळे महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षामधील कलह लपून राहिला नव्हता. तसेच माजी आमदार विलास लांडे यांनी ‘आता हवा पिंपरी चिंचवडला फक्त घड्याळाचा गजर’ अशा आशयाचे फलक शहरभर लावून सत्ताधारी भाजपच्या आश्‍वासनाची चिरफाड केली होती. वादग्रस्त प्रकरणांमुळे चांगलेच चर्चेत आलेले महापालिकेतील तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना कार्यमुक्त का केले ? असा सवाल आयुक्त राजेश पाटील यांना फ्लेक्सच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. असे फ्लेक्स ‘साठे परिवार आणि पिंपरी-चिंचवडकरां’च्या वतीने शहरात झळकले होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

SCROLL FOR NEXT