Pimpari Chinchwad Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Crime: माहेरून सोन्याचे दागिने अन् पैसे आण, सासरच्यांकडून उच्चशिक्षित दिव्याचा छळ; राहत्या घरी संपवलं आयुष्य

Divya Suryavanshi Case: पिंपरी-चिंचवडमध्ये वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका उच्चशिक्षित तरुणीने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी- चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात हुंड्याच्या छळामुळे आणखी एका वैष्णवीचा बळी गेला आहे. दिव्या हर्षल सूर्यवंशी (वय २६ वर्षे) या विवाहित महिलेने हुंड्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. राहत्या घरी दिव्याने गळफास लावून आयुष्य संपवले. माहेरून सोनं आणावे आणि फर्निचर बनवण्यासाठी पैसे आणावे या मागणीसाठी हर्षलचा नवरा आणि सासरचे तिचा छळ करत होते. या प्रकरणी हर्षलच्या सासरच्या मंडळींविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हर्षलच्या सासरच्यांनीच तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील W 57 या उच्चभ्रू सोसायटीत सोमवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. राहत्या घरात दिव्या सूर्यवंशीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दिव्याने आत्महत्या केली नसून तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळीने तिचा खून केल्याचा आरोप दिव्याच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. मूळची धुळे जिल्ह्यातील तसेच शेतकरी कुटुंबातील असलेली दिव्या भाऊसाहेब खैरनार ही उच्चशिक्षित तरुणी होती. तिचा विवाह जवळपास ३ वर्षांपूर्वी हर्षल शांताराम सूर्यवंशी या आयटी इंजिनिअर तरुणासोबत झाला होता.

लग्न झाल्यानंतर दिव्या नवरा हर्षल याच्यासोबत वाकड पोलिस स्टेशन हद्दीतील W 57 या उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. मात्र तिचा नवरा हर्षल सूर्यवंशी वारंवार तिच्या कुटुंबीयांकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत होता. तसेच त्याने घरातील फर्निचर बनवण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. दिव्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणात आता दिव्याचा नवरा हर्षल शांताराम सूर्यवंशी आणि तिच्या सासरच्या मंडळींविरोधात दिव्याचे माहेरचे कुटुंबीय वाकड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी हजर झाले आहेत. दिव्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हर्षल आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी दिव्याच्या नातेवाईकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - पुण्यात भीषण अपघात! पौड रस्त्यावरील मेट्रो स्टेशनच्या पिलरला धडकली कार

Local Body Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागणार निर्बंध? जाणून घ्या

Horoscope 6 November: या राशींसाठी आजचा दिवस असेल खास, तुमची रास कोणती?

Suraj Chavan Wife : बिग बॉस किंग सूरज चव्हाणची बायको कोण? नावही आहे खास

Maharashtra Politics: कोकणात मोठी राजकीय घडामोड, भाजपकडून ठाकरेसेना अन् शिंदेसेनेला धक्का; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT