AI Student End Life In Pimpari- Chinchwad Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpari- Chinchwad: पुण्यात AI चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, सीट बेल्टच्या सहाय्याने घेतला गळफास

AI Student End Life In Pimpari- Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये एआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. राहत्या घरी त्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • पिंपरी-चिंचवडमध्ये १९ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

  • सीट बेल्टच्या सहाय्याने घेतला गळफास

  • आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

  • जळगावमध्येही आयटीआयच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

गोपाल मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये १९ वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. एआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं. पिंपरी-चिंचवडच्या दिघीमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली. या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. दिघी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व देशमुख (१९ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अथर्वने रविवारी रात्री राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवले. आई घराबाहेर गेली असता या तरुणाने सीट बेल्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आई घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. पण तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. त्याला खाली उतरवून तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने आपला मोबाईल फॉरमॅट केला होता. घटनास्थळावर पोलिसांना सुसाइड नोट सापडली नाही त्यामुळे या तरुणाच्या आत्महत्येमागचं कारण कळाले नाही. तो एआयचे शिक्षण घेत होता. या तरुणाच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. दिघी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या तरुणाच्या आत्महत्येमागचं कारण शोधले जात आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जळगावातील शासकीय वसतिगृहात आयटीआयच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. वसतिगृहातील पहिल्या मजल्यावर तो आपल्या तीन मित्रांसोबत राहत होता. पंख्याला गळफास घेत त्याने आयुष्य संपवलं. रोहित समाधान पवार असे आत्महत्या करणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून तो धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी होता. 'मी माझा आयडी बंद करत आहे... गुडबाय!' अशी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत विद्यार्थ्याने आत्महत्या केली. रोहितने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar: 'त्या दिवशी माझा भुतांवर विश्वास...' अक्षय कुमारच्या घरात महिलेचा आत्मा, खिलाडीने सांगितला भयानक अनुभव

शैक्षणिक क्षेत्रातील मोठी बातमी! राज्यातील ३८ महिला पदवी महाविद्यालयांना मंजुरी

मोठी बातमी! भाजपच्या माजी मंत्र्याला अटक; पुणे पोलिसांच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ

कार अपघातात भाजपच्या दिग्गज नेत्यासह तिघांचा जागीच मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

Maharashtra Live News Update: - कॅप्टन अशोक खरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT