Pune Shocking Saam tv
मुंबई/पुणे

Pune Shocking: इच्छेविरोधात शारीरिक संबंध, गुप्तांगात हळद-कुंकू अन् लिंबू पिळला, पतीवर जादूटोणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Police Investigate Husbands Black Magic Allegations: एका ३६ वर्षीय विवाहित महिलेने पतीविरोधात काळी जादू आणि अमानवी वागणुकीबाबत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ३६ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच पतीने काळी जादू केल्याचा प्रकार घडला आहे. आधी गळ्यावर कोयता ठेवला. नंतर तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. शेवटी पत्नीच्या गुप्तांगावर हळद कुंकू लावलेल्या लिंबाच्या अर्ध्या फोडी ठेवून पिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेने आरोपी पती विरोधात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

पीडित महिला आणि आरोपीचे लग्न २००४ साली झाले होते. या जोडप्याला २ मुले आहेत. पती वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणामुळे दोघांमध्ये भांडणे होत. सततच्या भांडणाला कंटाळून पीडित महिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बालेवाडीत गेली. तसेच पती पिंपळे निलख परिसरात राहायला गेला.

मुलांची शाळा सुरू झाली. मुलांची पुस्तके घेण्यासाठी ती सासरी गेली. त्यावेळी पतीने 'घरातून काय काय सामान घेऊन जाते', असं म्हणत शिवीगाळ केली. पतीने मद्यपान केले असल्यामुळे तिने काहीही उत्तर दिले नाही. 'मी बोलतोय तरीही माझ्याकडे बघत नाही', असे म्हणत पतीने घरातील कोयता काढला अन् तिच्या गळ्यावर ठेवत तिचे जबरदस्तीने कपडे काढले.

पत्नीची इच्छा नसतानाही तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. नंतर घरातील लिंबाच्या चार फोडी आणल्या त्यावर हळद कुंकू वाहिलं. त्याच लिंबाच्या फोडी पतीने पत्नीच्या गुप्तांगावर पिळल्या आणि 'मी आता तुझ्यावर जादूटोणा केला आहे. आता तू वेडी होणार', असं म्हणाला. त्यानंतर पतीने जीवे मारण्याची धमकी दिली. काही दिवसांपूर्वी तिने हा सर्व प्रकार आपल्या आई आणि मामीच्या कानावर घातला.

पीडितेच्या कुटुंबाने याची माहिती आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते दीपक कांबळे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT