Crime News samm tv
मुंबई/पुणे

Pune Crime: 'तू जा मर', चाळिशीतल्या महिलेचं २१ वर्षीय तरूणासोबत अफेअर; पतीला कळताच स्वत:लाच संपवलं, पुढे जे घडलं..

Pimpri Chinchwad Crime: काळेवाडीत पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीने प्रियकराच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकून दिला. ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Bhagyashree Kamble

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. मृतदेह जंगलात फेकून दिलं. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधून उघडकीस आली असून, या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

१४ जून रोजी ही घटना काळेवाडीतील जगताप नगर परिसरात घडली. तय्यूब उस्मान शहा (वय वर्ष ४६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तय्यूब आपल्या पत्नीसोबत जगताप नगर परिसरात राहत होता. त्याचवेळी पत्नीचे शेजारी राहणाऱ्या साहिल कैलास घाडगे (वय वर्ष २१) या तरूणासोबत विवाहबाह्य संबंध सुरू झाले. याची माहिती तय्यूबला मिळाल्यानंतर त्याला राग अनावर झाला. या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले.

एकेदिवशी पत्नीने 'तू माझं आयुष्य नरक बनवलं आहेस, जा आणि मर', असं रागाच्या भरात म्हटलं होतं. सततच्या भांडणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. राहत्या घरातच गळफास घेत त्याने आयुष्य संपवलं. पतीने आत्महत्या केली असल्याचं समोर आल्यानंतर पत्नीने पोलिसांकडे न जाता थेट साहिलचं घर गाठलं. तसेच प्रियकराला याची माहिती दिली. त्यानंतर दोघांनी एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने एक प्लान रचला.

त्या तिघांनी रचलेल्या प्लानप्रमाणे तय्यूब शहा यांचा मृतदेह हिंजवडी परिसरातील कासरसाही धरणाजवळील निर्जनस्थळी नेऊन फेकला. काही दिवसानंतर तय्यूबचा मृतदेह स्थानिकांना सापडला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पुढील तपासात मृतक तय्यूब शहा यांच्या मुलाने काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तय्यूब शहा यांची पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या कटात सामील झालेल्या अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Sugar Level: रोज गोड खल्याने शरिरात शुगरचे प्रमाण किती वाढते?

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

Congress Leader Dies : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

SCROLL FOR NEXT