PCMC SaamTV
मुंबई/पुणे

अडीच किलो सोन्याच्या चोरीचा उलगडा, आरोपीला बेड्या; पिंपरी-चिंचवड पोलिसांची जबरदस्त कारवाई

गोपाल मोटघरे

पिंपरी - चिंचवड : दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक चांगला मुहूर्त समजला जातो. मात्र, याच दसऱ्याच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात (Pimpri-Chinchwad city) चिखली येथील महावीर ज्वेलर्स (Mahavir Jewelers) मध्ये दुकानात काम करणाऱ्या कामगाराने अडीच किलो वजनाचे सोन्याचे दागिने पळविले होते.

हे देखील पहा -

या दागिन्यांची किंमत जवळपास 1 कोटी 18 लाख 66 हजार रुपये इतकी होती.  महावीर ज्वेलर्स मध्ये काम करणारा मुकेश तिलोकराम सोलंकी याने दुकानात गर्दी असताना सोन्याचे दागिने पळविले होते. याची दृश्य देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली होती. जवळपास दहा दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर पिंपरी - चिंचवड पोलिसांनी मुकेश सोलंकी याला अटक करून त्याच्या जवळून अडीच किलोग्राम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील मारवाड तालुक्यातील वोपारी या गावांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri-Chinchwad Police) गुंडा विरोधी पथकाने मुकेश सोलंकी याला अटक  केली आहे. एवढ्या मोठ्या चोरीचा छडा लावल्याने पोलिसांचे मात्र मात्र व्यापारी वर्गाकडून कौतुक केले जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT