Pimpri-Chinchwad Fraud Case
Pimpri-Chinchwad Fraud Case Saam TV
मुंबई/पुणे

चुंबकीय शक्तीने तांदूळ खेचून घेणाऱ्या भांड्यांच्या नावाखाली गंडवलं; निलंबित पोलिस गजाआड

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड: आपल्याकडे चुंबकीय शक्तीने तांदूळ खेचून घेणारे चमत्कारी भांडं आहे. ते भांडं मला अमेरिकेतील नासा संस्थेला पाच हजार कोटी रुपयांना विकायचा आहे. असं सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) गजाआड केलं आहे. रॉबर्ट उब्लडो रोजीरिओ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

महत्वाची बाब म्हणजे रॉबर्ट उब्लडो रोजीरिओ हा रेल्वे विभागाचा निलंबित पोलीस कर्मचारी (Suspended police personnel) आहे. आपण स्वतः नासामध्ये काम करत असल्याचे सांगून स्वतःकडे चमत्कारिक भांडं असल्याचं भासवून तो लोकांच फसवणूक करायचा. त्यासाठी त्यांनी आरबीआयचे (RBI) काही बनावट कागदपत्र देखील तयार केली होती. या द्वारे त्यांने सुभाष ससार नावाच्या व्यक्तीला तब्बल ४९ लाखांना गंडा घातला आहे.

पाहा व्हिडीओ -

नासाकडून (NASA) माझ्या नावावर आरबीआय बँकेमध्ये कोट्यावधी रुपये जमा झाल्याच भासवत श्रीमंत लोकांची फसवणूक करायचा. तसंच शेअर मार्केटमध्ये देखील गुंतवणूक करतो असं सांगून तो सर्व सामान्य गुंतवणूकदाराची लाखो रुपयांची फसवणूक करायचा. अशा प्रकारे रॉबर्ट उब्लडो रोजीरिओ यांने शेकडो गुंतवणूदारांची फसवणूक केल्यास पोलीस तपासात समोर आला आहे.

रॉबर्ट उब्लडो रोजीरिओ विरोधात हिंजवडी पोलिसांनी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर आरोपीला फसवणुकीत मदत करणाऱ्या सोनल जाधव, पूजा गरुड संगीता नगरकर, मेहुल गांधी आणि सतीश मुरेकर यांना देखील हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी सांगितलं.

रॉबर्ट उब्लडो रोजीरिओ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी फक्त एक-दोन लोकांची नव्हे तर शेकडो जणांची कोट्यावधी रुपयाची फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याच आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून (Pimpri-Chinchwad) करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT