Pimpri Chinchwad Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : आईच्या प्रियकराकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; पिंपरी चिंचवडमधील संतापजनक घटना

Pimpri Chinchwad Crime News : आईच्या प्रियकराने 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड शहरात एक अतिशय संतापजनक घटना घडली. आईच्या प्रियकरानेच 14 वर्षीय मुलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. शहरातील रावेत परिसरात हा प्रकार घडला. पीडित मुलीने हिम्मत दाखवून घडलेला प्रकार आपल्या वर्गशिक्षिकेला सांगितला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पंकज असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज आणि पीडितेची आई एका ठिकाणी कामाला आहेत. दोघांचे अनैतिक प्रेमसंबंध असल्याने आरोपी हा पीडितेच्या घरी येत जात होता.

एकेदिवशी पीडितेची आई घरी नसताना आरोपी घरी आला. त्याने अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार (Crime News) केला. घडलेला प्रकार पीडितेने आपल्या आईने सांगितला. पण तुला भास झाला असेल असं म्हणत आईने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर पुन्हा काही दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेसोबत अनैसर्गिक अत्याचार केला.

तेव्हा पीडिता मानसिक तणावात गेली. तिने घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या वर्गशिक्षिकेला सांगितली. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी पोलिसांना शाळेत बोलावून घेतली. महिला पोलिसांनी (Police) पीडितेची फिर्याद ऐकून घेतली. त्यानंतर आरोपी पंकज याला रावेत पोलिसांनी अटक केली. त्याच्यावरती भारतीय न्याय संहिता 74, 75 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 7,8, 11 आणि 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT