AI Smart Traffic Signal
AI Smart Traffic Signal Saam Tv
मुंबई/पुणे

AI Smart Traffic Signal: पिंपरी चिंचवडच्या तरुणाची कमाल, वाहतूक कोंडीवर काढला तोडगा; AI स्मार्ट सिग्नल केला तयार

गोपाळ मोटघरे

Pimpri Chinchwad AI Smart Traffic Signal: दररोज होणारी मोठी वाहतूक कोंडी ही प्रत्येक मोठ्या शहराची गंभीर समस्या आहे. मात्र या समस्येवर पिंपरी चिंचवडमधील एका संगणक अभियंता तरुणांने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पहिल्यांदाच स्मार्ट सिग्नल तयार केला आहे. आयटी हब अशी ओळख असलेल्या हिंजवडी (Hinjewadi) भागात हा स्मार्ट सिग्नल सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी रियल टाईम ट्राफिक सीसीटीव्ही सेंसर वापरण्यात आलेले आहेत.

देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून रियल टाईम ट्रॅफिक सीसीटीव्ही सेंसर सिग्नल उभारण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसर शहरातील सर्वात जास्त वाहतूक कोंडीचा परिसर म्हणूनही प्रसिद्ध आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी याठिकाणी अनेक प्रयत्न झाले, मात्र वाहतूक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहे.

या पार्श्वभूमीवर हिंजवडीतील गर्दीचा समजला जाणाऱ्या विनोदे वस्ती चौकात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पहिला स्मार्ट सिग्नल बसवण्यात आला आहे. या सिग्नलला सीसीटीव्ही कॅमेरासह सेन्सर असल्याने वाहनांच्या गर्दीवर सिग्नलचा वेळ निर्धारित होते, यामुळे चौकातील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र आहे. शहरातील प्रदीप गिलबिले या संगणक अभिनेत्याने केलेला हा प्रयोग यशस्वी होत असून यानंतर पूर्ण शहरात स्मार्ट सिग्नल दिसण्याची शक्यता आहे.  (Latest Marathi News)

या सिग्नलला सीसीटीव्ही केमेरा सेन्सर असून वाहनांच्या गर्दीवर सिग्नलची वेळ बदलते. गाड्यांची संख्या कॅप्चर करून सिग्नल बदलला जातो. सिग्नलवर एकही गाडी नसल्यास सिग्नल पडत नाही. विशेष म्हणजे रुग्णवाहिका, सायरन अथवा दिव्याची गाडी आल्यास सिग्नल हिरवा होतो आणि ते वाहन गेल्यास पुन्हा पूर्ववत होतो.

चौकात चहुबाजूने गर्दी झाल्यास गाड्यांचा सरासरी वेळ लक्षात घेऊन सिग्नल बदलतो. ग्रीन कॉरिडॉर किंवा व्हीआयपी मुव्हमेंटला सिग्नल आपोआप सेट होतो. तसेच गरज पडल्यास सिग्नल मॅन्युअली हाताळता येतो.

सध्या हिंजवडी परिसरातील फक्त काही सिग्नल वर प्रायोगिक तत्त्वावर हे स्मार्ट सिग्नल बसविण्यात आले आहेत. या सिग्नलची कार्यक्षमता पाहून लवकरच संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात अशाप्रकारे सिग्नल बसवले जाण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

Today's Marathi News Live : रोहित वेमुला मृत्यू प्रकरणाचा पुन्हा तपास होणार

IRCTC Hotel Service : स्टेशनवर 100 रुपयांत मिळणार हॉटेलसारखी रूम; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Amaravati Express Fire : दादर रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेसला आग, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT