Pimpri - Chinchwad Sangvi Area Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri - Chinchwad Fire Video: गॅस सिलेंडर रिफिलिंग करताना स्फोट; पत्राशेड झोपडपट्टीमधील घरांना भीषण आग, हवेत पसरले धुरांचे लोट

Pimpri - Chinchwad Sangvi Area Fire: गॅस सिलेंडर रिफिलिंग करताना स्फोट होऊन झोपडपट्टीमधील घरांना आग लागलीय. या आगीत जीवितहानी जरी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालीय.

Bharat Jadhav

गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरामध्ये पत्राशेड झोपडपट्टीमधील घरांना भीषण आग लागलीय. या झोपडपट्टीमध्ये अवैध पद्धतीने गॅस सिलेंडर रिफिलिंग केलं जात होतं. त्यावेळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर येथील घरांना आग लागल्याची घटना घडली.

शिवरामनगर येथील पत्रा शेड झोपडपट्टी घरांना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही आग लागलीय. दोन ते तीन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. पत्राशेड झोपडपट्टीमध्ये अवैध पद्धतीने गॅस सिलेंडर रिफिलिंग केलं जात होतं. त्यावेळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग लागली, असावी, असा प्राथमिक अंदाज त्या भागातील स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तीन अग्निशमन बंबच्या सहाय्याने सध्या आग आटोक्यात आणली आहे. या आगीत सध्या कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT