Pimpri Chinchwad Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad Crime News: सुरक्षा रक्षक म्हणावं की गुंड, लोखंडी रॉडने केली सोसायटीतील रहिवाशांना मारहाण

Pimpri Chinchwad Latest News: सुरक्षा रक्षक म्हणावं की गुंड, लोखंडी रॉडने केली सोसायटीतील रहिवाशांना मारहाण

गोपाळ मोटघरे

Pimpri Chinchwad Crime News: पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली परिसरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. सोसायटीमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनीच, सोसायटीच्या काही रहिवासांना अमानुष मारहाण केली आहे.

लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, बाबू तसेच लाठ्या - काठ्यांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी सोसायटीमधील तिन रहिवाशांना बेदम मारहाण केली आहे. प्राइड वर्ल्ड सिटीच्या मेन गेटवरील पंधरा ते वीस सुरक्षारक्षकांनी केलेल्या मारहाणीत मंगेश हवय्या मटपती याचं हात मोडल आहे. तर स्वप्निल तुकाराम देवकर याच्या डोक्याला 11 टाके लागले आहेत आणि चंद्रशेखर हनुमंत रोमन याच्या डोक्याला 8 टाके लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राइड वर्ल्ड सिटीच्या मुख्य गेटवर एके फोर्टी सेवन सेक्युरिटी कंपनीचे सुरक्षा रक्षक तैनात आहेत. मात्र त्या ठिकाणी मागिल काही दिवसापासून चैन सन्याचींग, मोबाईल सन्याचींग आणि महिलाना छेड काढण्याच्या घटना घडत आहेत. (Latest Marathi News)

याविषयी प्राइड वर्ल्ड सिटीचे तीन रहिवासी सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना मध्यरात्री मद्यप्राशन करून जाब विचारत होते. यादरम्यान सोसायटीतील सुरक्षारक्षकात आणि तीन रहिवाशात शिवीगाळ करून जोरदार बाचाबाची झाली. मात्र सुरक्षारक्षकांनी पोलिसांची मदत न घेता स्वतःच कायदा हातात घेऊन.

सोसायटीतील तीन रहिवाशांना अमानुष मारहाण केली आहे. या प्रकरणात मंगेश हवय्या मटपती यांच्या तक्रारीवरून दिघी पोलीस स्टेशनमध्ये प्राईड वर्ल्ड सिटीच्या पंधरा ते वीस सुरक्षारक्षकान विरोधात भादवि कलम 307, 326, 323 आणि इतर काही गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर दिघी पोलिसांनी प्राइड वर्ल्ड सिटीच्या काही सुरक्षारक्षकांना अटक देखील केली आहे. मात्र सुरक्षारक्षकांनी कुणाच्या इशाऱ्यावरून सोसायटीच्या रहिवाशांना मारहाण केली. याचा तपास होण गरजेचे आहे, अशी मागणी मारहाण झालेल्या सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Vangi Recipe : गावरान भरली वांगी, रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

Gokul Milk : कोल्हापूरचा गोकुळ दूध ब्रँड आता आईस्क्रीमसह बाजारात, मोठी घोषणा

Maharashtra Live News Update: हिंगोलीत ओढ्याला पूर येऊन गावकऱ्यांचा संपर्क तुटला

Akola Crime : अकोला हादरलं! चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सकल हिंदू आक्रमक

Smartphone Hanging: तुमचा फोन वारंवार हॅंग होतो का? मग 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT