Pimpri-Chinchwad Crime News
Pimpri-Chinchwad Crime News saam tv
मुंबई/पुणे

Crime : मटणाच्या सूपमध्ये भात का? ग्राहक भडकला, बेदम मारहाणीत वेटरचा मृत्यू

गोपाल मोटघरे

Pimpri-Chinchwad Crime News : 'मटणाच्या सूपमध्ये भात का आहे ? तुमचं जेवण व सर्विस चांगली नाही, असं म्हणत दोन ग्राहकांनी हॉटेलमधील वेटरला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत वेटरचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर भागातील सासुरवाडी खाणावळ या भागात सदर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मटणाच्या सूपमध्ये भात का आहे ? तुमचं जेवण व सर्विस चांगली नाही, असं म्हणत दोघांनी मंगेश संजय पोस्ते या वेटरला बेदम मारहण केली. बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वेटरचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील पिंपळे सौदागर भागातील सासुरवाडी खाणावळमध्ये सदर घटना काल, मंगळवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात सांगवी पोलिसांनी (Police) अमित अमृत मुठकुळे आणि सचिन सुभाष भवर या दोन आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं ?

अमित अमृत मुठकुळे आणि सचिन सुभाष भवर हे दोन्ही आरोपी काल रात्री पिंपळे सौदागर भागातील सासरवाडी खानावळ मध्ये जेवायला गेले होते. त्यादरम्यान दोन्ही आरोपी आणि हॉटेलच्या वेटरमध्ये सर्विस देण्यावरून किरकोळ वाद झाला होता. त्याच वादातून दोन्ही आरोपींनी खानावळ मध्ये भांडण करण्यास सुरुवात केली

त्यानंतर काही अवघ्या काही मिनिटांतच दोन्ही आरोपींनी बाहेर येऊन खानावळमधील कामगारांना बेदम मारण्यास सुरुवात केली. या मारहाणीत दोन्ही आरोपींनी मिळून मंगेश संजय पोस्ते या सासुरवाडी खानावळमध्ये काम करणाऱ्या वेटरचालाकडी दांडक्याने मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार आहेत. आता या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Marriage Story | पोलिसांनी शोधलं आणि आईवडिलांसमोर लग्न लावलं! अजब-गजब प्रेमकहाणी

Borghat Waterfall : ऐन उन्हाळ्यात धबधबे झाले प्रवाहित; मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवाशांना वेगळा अनुभव, पाहा Video

श्रीकांत शिंदेंच्या घरासमोरून जात होता उद्धव ठाकरेंचा ताफा, शिवसैनिकांच्या जोरदार घोषणा, VIDEO पाहा

Today's Marathi News Live : अल्पवयीन मुलीचा खून करून मृतदेह टाकला विहिरीत , ग्रामस्थांचं मालेगाव-नामपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन

Coffee पिणं आरोग्यासाठी गुणकारी?

SCROLL FOR NEXT