Thergaon Hospital Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : MRI करण्यासाठी रुग्णालयात गेल्या, माय-लेकीसोबत घडलं भयंकर

Mother And Daughter Molestation By Ward Boy: पिंपरी-चिंचवडमधील महानगर पालिकेच्या रुग्णालयात महिला आणि तिच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये माय-लेकींचा रुग्णालयामध्ये विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात ही घटना घडली आहे. वार्ड बॉयने रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या माय -लेकीसोबत भयानक कृत्य केले. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड येथे राहणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीवरून थेरगाव रुग्णालयाचा वार्ड बॉय रोहन कांबळे यांच्याविरोधात वाकड पोलिस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला आपल्या मुलीसह आपल्या नातेवाईकाचा एमआरआय करण्यासाठी थेरगाव रुग्णालयामध्ये शनिवारी सात वाजताच्या दरम्यान गेली होती.

थेरगाव रुग्णालयात त्यावेळी उपस्थित असलेल वॉर्ड बाय रोहन कांबळेने फिर्यादी महिलेला आणि तिच्या मुलीच्या अंगाला वाईट पद्धतीने स्पर्श करून त्यांचा विनयभंग केला. या घटनेमुळे या मायलेकी घाबरल्या. त्यांनी थेट वाकड पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत वार्ड बॉयविरोधात तक्रार दाखल केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या महिला देखील सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजीत दीपकेने दिली महत्वाची अपडेट, सरकारला दिला थेट इशारा

Pune IT Job Scam: पुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने मोठा घोटाळा; ३०० हून अधिक तरुणांची फसवणूक, कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग भुईसपाट

झेरॉक्सला मराठीत काय म्हणतात?

Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार , अल्पवयीन मुलीची प्रसूतीनंतर बाळ विकलं; दोन नामांकीत डॉक्टरांसह ११ जणांना ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT