Pimpari Chinchwad News Saamtv
मुंबई/पुणे

Pimpari Chinchwad News: हिंजवडीत भलेमोठे होर्डिंग कोसळले! २ तरुण जखमी; पावसामुळे आसरा घेतला अन्...

Hoarding collapsed In Hinjawadi : चाकरमान्यांनी पावसापासून स्वतःला वाचवण्याकरिता या होर्डिंगचा आसरा घेतला होता.

गोपाल मोटघरे

Hinjewadi News: पिंपरी चिंचवड शहरात आज संध्याकाळी पुन्हा एकदा एक मोठी होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या होर्डिंगखाली दबून चार जण गंभीर जखमी झाले असून चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील होर्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या पुणे तसेच पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. याच पावसामुळे शहरात आज संध्याकाळी पुन्हा एकदा होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. आज संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यात हिंजवडी परिसरातील मान भागात एक मोठी लोखंडी होर्डिंग भर रस्त्यावर कोसळली आहे. या होर्डिंग खाली दबून दोन तरुण जखमी झाले आहेत.

पाऊस आल्यानंतर रस्त्याने ये - जा करणाऱ्या चाकरमान्यांनी पावसापासून स्वतःला वाचवण्याकरिता या होर्डिंगचा आसरा घेतला होता. मात्र अचानक होर्डिंग कोसळल्याने ही मोठी दुर्घटना घडली. तसेच यामध्ये काही तीन-चार दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटनेतील जखमींवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रावेत परिसरामध्ये पुणे - मुंबई हायवे वर एक मोठी अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरात वादळी वाऱ्यात मोठी होर्डिंग कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. आज कोसळलेल्या होर्डिंग ला परवानगी कुणी दिली होती ? तसेच ही होर्डिंग अधिकृत होती की अनधिकृत ? याचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये अतीवृष्टीचा बळी

Badlapur Tourism : रिमझिम पावसात धबधब्याखाली चिंब भिजा, येणारा वीकेंड बदलापूरला प्लान करा

Pune : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यात निधन

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

Fasting Food : उपवासाला बनवा 'ही' खास स्मूदी, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

SCROLL FOR NEXT