Pimpari Chinchwad Latest News Saamtv
मुंबई/पुणे

Pimpari Chinchwad Fire: पिंपरी चिंचवडमध्ये अग्नितांडव! बिल्डिंगला लागलेल्या आगीत २ घरांसह २० दुचाकी जळून खाक

Pimpari Chinchwad Latest News: पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर भागातील एका वसाहतीमध्ये रविवारी (२४ डिसेंबर) मध्यरात्री भीषण आग लागली. या भीषण आगीत दोन घरे आणि जवळपास 20 दुचाकी वाहने पुर्णपणे जळून खाक झाली आहेत.

गोपाल मोटघरे

Pimpari Chinchwad Fire News:

पिंपरी चिंचवडमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर भागातील एका वसाहतीमध्ये रविवारी (२४ डिसेंबर) मध्यरात्री भीषण आग लागली. या भीषण आगीत दोन घरे आणि जवळपास 20 दुचाकी वाहने पुर्णपणे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवडच्या (Pimpari Chinchwad) नेहरूनगर परिसरामध्ये विठ्ठल नगर नावाच्या वसाहतीमधील पाच नंबरच्या बिल्डिंगमध्ये रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीने अवघ्या काही क्षणात रौद्ररूप धारण केल्याने बिल्डिंग मधील दोन घरांसह २० दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या.

याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. ज्या बिल्डिंगमध्ये आग लागली त्या बिल्डिंगचे निर्माण पिंपरी चिंचवड महापालिकेने केला आहे. मात्र ह्या रहिवासी बिल्डिंगमधील फायर फायटिंग सिस्टम नसल्याने आगीने रौद्ररुप धारण केले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप समोर आले नाही, मात्र बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये अज्ञातांनी दुचाकी वाहनांना आग लावली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT