Phule Wada in Pune where authorities have banned Vat Savitri Puja and other religious activities to preserve the historic structure. saam tv
मुंबई/पुणे

महिलांना मोठा धक्का! फुले वाड्यात वटपौर्णिमेची पूजा बंद; राज्य सरकारचा निर्णय, कारण काय?

Vat Savitri Puja Prohibited At Historic Phule Wada After Govt Order: पुण्यातील ऐतिहासिक फुले वाड्यात वटसावित्री पूजेसह सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. वारसा जपण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेत, पुण्यातील फुले वाड्यात यंदा वटसावित्री पूजेसह कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबत पुरातत्व विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचे वंशज प्रशांत फुले यांनी यासंदर्भात सरकारकडे याचिका दाखल केली होती. ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य राखणे आणि सांविधानिक नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता. त्यानंतर सरकार आणि संबंधित विभागाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षी वटपोर्णिमेच्या दिवशी फुले वाड्यात पूजा करण्यावरून महिला, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने धार्मिक कार्यक्रमांवर बंदी लागू केली आहे.

पुरातत्व विभागाने स्पष्ट केले आहे की, संरक्षित ऐतिहासिक वास्तूंमध्ये कोणतेही धार्मिक किंवा सार्वजनिक कार्यक्रम घेताना नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि वारसा स्थळांचे संरक्षण व्हावे, या उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयामुळे पुन्हा एकदा फुले वाडा वाद चर्चेत आला असून, सामाजिक आणि राजकीय पातळीवर विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी स्पेनमधील एक कुटुंब मुंबईत आलं

Sugar Free Drink For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी 5 शुगर फ्रि ड्रिंक, रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Ganesh Chaturthi 2027: पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येणार, तारिख आत्ताच लिहून घ्या

7 Best Vegetables for Diabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी आवर्जून खाव्यात ‘या’ 7 भाज्या; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Vanita Kharat: वनिता खरातचा जबरदस्त फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन; तब्बल २४ किलो वजन केलं कमी

SCROLL FOR NEXT