Nair Hospital Mumbai Viral Photos सुमित सावंत
मुंबई/पुणे

Nair Hospital Mumbai: नायर रुग्णालयात रुग्णांना जमिनीवर झोपण्याची वेळ; फोटोज् व्हायरल

Nair Hospital Mumbai Latest News: सध्या १६२६ बेड्स आहेत. आगामी काळात १८०० बेड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या नायर या शासकीय रुग्णालयात (Nair Hospilal Mumbai) रूग्णांना चक्क जमिनीवर झोपावं लागतंय. रुग्णालयात असलेल्या प्रत्येक बेडखाली आणखी एका रूग्णाला ॲडमिट (Admit) करण्यात आलयं. पालिकेच्या (BMC) रुग्णालयात रूग्णांची (Patients) संख्या वाढत ‌असल्याने रूग्णालयातील बेड्स आणि आरोग्य सुविधा अपुऱ्या पडतायत, यामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत. रुग्णांचे होणारे हाल हे आम आदमी पक्षाने (Aam Admi Party) समोर आणले आहेत. याबाबतचे फोटोज् आता सोशल मीडियावर व्हायरल (Viral Photos) होत आहेत.

हे देखील पहा -

याबाबत नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता कल्पना मेहता यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की, नायर हे टरशरी के‌अर हॅास्पिटल आहे. मुंबईबाहेरील रुग्ण आमच्याकडे कायम येत असतात, यात ओपीडीला ३ हजार रूग्ण दररोज येतात. २०० ते ३०० रूग्ण ॲडमिट केले जातात. सध्या १६२६ बेड्स आहेत. आगामी काळात १८०० बेड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु रूग्णालयातील अनेक रूग्णांना ॲडमिट झाल्यानंतर लगेचच डिस्चार्ज देण्यासाठी अनेक अडचणी येतात. रूग्ण इतर रूग्णालयात दाखल होण्यासाठी तयार होत नाही. मेडीसीन सर्जरी आणि स्त्री रोग विभाग या विभागात रूग्ण ‌अधिक आहेत. १८ पेरिफेरल हॅास्पिटलला रूग्ण वळवता येतील का याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT