ATS Chargsheet on PFI  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : भारताला इस्लामिक राज्य बनवण्यासाठीचा PFIचा मेगा प्लॅन, ATSच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासा

आरोपींना 2047 पर्यंत भारताची हिंदू राष्ट्र ओळख पुसून "इस्लामिक स्टेट" करण्याचा कट आरोपींचा होता.

सुरज सावंत

सुरज सावंत

ATS Chargsheet On PFI : भारताला इस्लामिक राज्य बनवण्यासाठी लोकांमध्ये फूट पाडा, प्रशिक्षण द्या असा धक्कादायक खुलासा एटीएसच्या आरोपपत्रातून करण्यात आला आहे. एटीएसच्या आरोपपत्रमध्ये, मुंबईतून अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतात विशेषत: लक्षद्वीप आणि जम्मू-काश्मीरमधील 8 जिल्ह्यांमध्ये 70 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे आणि लोकसंख्येमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. त्यानुसार 2047 मध्ये हा आकडा 100 टक्के होईल, त्यानंतर भारताला मुस्लिम घोषित करण्याबाबतचा मजकूर होता. यातून आरोपींना 2047 पर्यंत भारताची हिंदू राष्ट्र ओळख पुसून "इस्लामिक स्टेट" करण्याचा कट आरोपींचा होता.

आरोपीच्या फोनवरून पेट्रोल बॉम्ब बनवण्यापासून तलवार, लाठी, कराटे प्रशिक्षणापर्यंतचे अनेक व्हिडिओ सापडले असल्याचे PFI च्या आरोपपत्रातून समोर आले आहे. महाराष्ट्र एटीएसने पीएफआयच्या तपासादरम्यान अटक केलेला आरोपी मोहम्मद इक्बाल मोहम्मद इब्राहिम खान याच्याकडून अनेक व्हिडिओ सापडले आहेत.

त्यापैकी एका व्हिडिओमध्ये काचेच्या बाटलीत पेट्रोल भरण्यासाठी कापड कसे वापरायचे, बॉम्ब कसा बनवायचा याचा व्हिडिओ होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, SDPI च्या कार्यक्रमात महिला लाठ्या चालवताना दाखवल्या जात आहेत. यासोबतच एका व्हिडिओमध्ये मौलाना अहमद नदवी लोकांना आवाहन करताना दिसत आहेत की, मुस्लिमांनी भारत सरकारच्या विरोधात कसे एकजूट व्हावे आणि पीएफआयमध्ये सामील व्हावे.

पोलिसांना (Police) आरोपी शेख सादिक इसाक कुरेशीच्या मोबाईलमध्ये पीएफआयने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये तरुणांना लाठीमार आणि कराटेचे प्रशिक्षण दिले जात आहे. पीएफआयचा सचिव अनीस अहमद यांच्या मोबाइलमधील व्हिडिओत बाबरी मशिदीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध कायदेशीर मार्गाने कसे जायचे याबद्दल बोलले गेले आहे.

तसेच त्याच्या मोबाइलमधील आणखी एका व्हिडिओत “03 समस्या का समाधान” या विषयावर बोलत आहेत, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, देशात लागू असलेले कायदे मुस्लिमांच्या विरोधात कसे आहेत, तसेच भारतातील सरकारी संस्था कशा गैरवापर करतात हे सांगितले आहे.

महाराष्ट्रात PFI वाढवण्याबाबत होती योजना

ATS ला आरोपी मोहम्मद इक्बाल खानच्या मोबाईल वरून “MH विस्तार परिपत्रक (प्रस्ताव)” प्राप्त झाले, ज्यामध्ये संघटनेचा संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार करणे आणि त्यासाठी स्वतंत्र टीम तयार करणे आणि त्या टीमला कसे बळकट करावे आणि प्रशिक्षण कसे द्यावे हे नमूद केले आहे.

या स्पेशल टीममध्ये कोणाचा समावेश करावा, तो काय करतो, त्याचा व्यवसाय काय, तो कोणत्या संस्थेत होता, त्याच्यावर पोलिस केस आहे की नाही, या सर्व माहितीच्या आधारे त्याची नियुक्ती करावी. जेणेकरून त्याचा उपयोग आंदोलन, सभा किंवा मुस्लिम सामाजिक कार्यासाठी करता येईल.मीडियावर काही पोस्ट करण्यासाठी करता येईल.

याशिवाय या संस्थेच्या कामासाठी प्रत्येक मशिदीत जागा देण्याबाबतही काही मजकूर यात आढळून आला आहे. यावरून एटीएसने दावा केला आहे की, हे नियोजन पाहून भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या कट PFI शी संबधित आरोपींचा असल्याचे स्पष्ट होते.

मंदिर मशिदीचा इतिहास

एटीएसला आरोपी इक्बाल खानच्या मोबाईलमधून काही कागदपत्रे मिळाली आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील जुन्या मंदिरे आणि मशिदींशी संबंधित खूप जुनी माहिती आहे. त्या दस्तऐवजात असा दावा करण्यात आला आहे की, अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पूर्वी मशीद होती आणि आता मंदिर आहे. या माहितीचा वापर करून हे आरोपी भविष्यात हिंदू मुस्लिमांमध्ये वैर निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात असा एटीएसला संशय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT