Uddhav Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : उद्धव ठाकरे गटाला हायकोर्टाचा मोठा दणका, मुंबईतील प्रभागरचना पूर्ववत केल्याविरोधातील याचिका फेटाळली

Mumbai News : महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या 227 वरुन वाढवून वाढवून 236 केली होती.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मुंबई महापालिका प्रभाग संख्येसंदर्भात दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेत प्रभागांची संख्या 227 कायम राहणार आहे.

मुंबई उच्च न्यायलयाने याचिकेत काही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुकरे, न्यायमूर्ती एम डब्ल्यू चंदवाणी यांच द्विसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या 227 वरुन वाढवून वाढवून 236 केली होती.

मात्र महाविकास आघाडीचं सरकार बदलताच शिंदे-फडणवीस सरकाने हा निर्णय रद्द करत प्रभागांची संख्या पुन्हा २२७ वर नेली होती. या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे राजू पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. बीएमसी प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेसंदर्भातील सुनावणी 18 जानेवारीला पूर्ण झाली होती. मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय राखून ठेवला होता. (Latest Marathi News)

याचिकेला वर्तमान राज्य सरकारचा जोरदार विरोध होता आणि त्यांनी याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर आम्ही कुठल्याही अधिसूचनेला नाही, तर कायद्याला बांधिल असल्याचं राज्य निवडणूक आयोगाने म्हटलं होतं.

राज्य सरकार जसे आदेश जारी करतं त्यानुसार आम्ही काम करतो अशी भूमिका निवडणूक आयोगाने न्यायालयात मांडली होती. 236 प्रभाग संख्येनुसार निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाली होती, मात्र तेव्हा त्यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. त्यानंतर रातोरात सरकार बदललं आणि एका निर्णयानं सारी प्रक्रिया रद्द केल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT