Sharad Pawar On Modi Government: 'या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही'; शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

Latest News In Marathi: मोदी सरकारच्या (Modi Government) निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाला असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.
Sharad Pawar On Modi Government
Sharad Pawar On Modi GovernmentSaam Tv
Published On

Mumbai News: जम्मू काश्मीरचे (Jammu Kashmir) माजी राज्यपाल आणि भाजपाचे वरिष्ठ नेते सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी पुलवामा हल्ल्याबाबत (Pulwama Attack) मोठा गौप्यस्फोट केला. मोदी सरकारच्या (Modi Government) निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाला असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. तसंच या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मला शांत राहण्यास सांगितल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.

सत्यपाल मलिक यांच्या या गौप्यस्फोटानंतर आता विरोधकांकडून भाजप सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोदी सरकारला सत्तेत बसण्याचा अधिकार नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

शरद पवार यांनी सांगितले की, 'पुलवामामध्ये जवानाची हत्या कशामुळे झाली. त्या ठिकाणी असणाऱ्या राज्यपाल मलिक त्याची नियुक्ती भाजपने केली होती. जवानांना हवं ते साधन न मिळाल्याने त्याचा जीव गेला असे मलिकांनी सांगितले. त्यांनी देशाच्या वरिष्ठांना हे सांगितले. पण त्यांनी न बोलण्यासाठी त्यांना सागितले. त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही.' असे परखड मत शरद पवार यांनी मांडले आहे.

तसंच राज्यात अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानावर प्रतिक्रिया देताना देखील त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. 'आज शेतकरी अडचणीत आहे. दहा दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये शेतकरी मेळाव्याला गेलो. अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं. निसर्ग आपल्या हातात नाही पण संकटातील शेतकऱ्यांना बाहेर काढणे सरकारची जबाबदारी आहे. शेतकरी आत्महत्या करतात हे दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने मदत केली पाहिजे.' अशी मागणी शरद पवारांनी गेली.

त्याचसोबत, 'आज महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाऊसामुळे हाहाकार झाला आहे पण अजून मदत मिळाली नाही. शेतीमाल निर्यातीला बंदी आणि माल आयत करण्यासाठी परवानगी दिली यांची पूर्ण जबाबदारी भाजप सरकारवर आहे. या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. याबाबत निर्णय घेतला पाहिजे.' असे देखील मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com