Ambarnath Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Ambarnath Crime News : आलिशान गाडी, काचेवर विधीमंडळाचं स्टिकर; तोतया महिला आमदाराला अंबरनाथमध्ये अटक

Fake Mla in Ambarnath : अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या महिलेसह दोघांना अटक केली आहे. वंदना संजय मिश्रा असं तोतया आमदाराचं नाव आहे. अनमोल कुमार सिंह यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अजय दुधाणे

Ambarnath Crime News :

अंबरनाथमध्ये तोतया महिला आमदाराला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित महिलेने लोकांना फसवण्यासाठी आपल्या गाडीवर विधीमंडळ सदस्याचे स्टिकर लावले होते. हे स्टिकर दाखवून महिला आपण आमदार असल्याचं भासवत होती.

एका व्यक्तीची ५ लाखांची फसवणूक केल्यानंतर या महिलेचं बिंग फुटलं आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या महिलेसह दोघांना अटक केली आहे. वंदना संजय मिश्रा असं तोतया आमदाराचं नाव आहे. अनमोल कुमार सिंह यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल कुमार सिंह यांनी या महिलेकडून फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली होती. अनमोल कुमार सिंह यांना पिस्तुल आणि शस्त्र परवाना हवा होता. यासाठी वंदना मिश्रा या महिलेने त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ५ लाख २० लाखांची फसवणूक केली. (Crime News)

मात्र एवढी पैसे देऊनही आपलं काम होत नाही हे पाहून अनमोल कुमार यांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये कलम ४२० आणि ४१९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. दोन जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

आमदार आहे हे भासवण्यासाठी वंदना मिश्रा यांनी गाडीवर विधानसभा सदस्याचं स्टिकर लावलं होत. महिलेविरोधात याआधी ४-५ गुन्हे नोंद आहेत. साकीनाक परिसरात गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh Chess World Cup : दिव्या देशमुख बनली वर्ल्ड चॅम्पियन! नागपूरच्या १९ वर्षीय लेकीनं घडवला इतिहास

Brain Exercises: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा 'या' ब्रेन ॲक्टिव्हिटिज

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

SCROLL FOR NEXT