Bhayandar Crime News
Bhayandar Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Bhayandar News: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना घालता लाखोचा गंडा, आरोपीला अटक

Priya More

चेतन इंगळे, वसई

Bhayandar Police: देशामध्ये अनेक उच्चशिक्षित तरुण आहेत पण नोकऱ्या मिळत नसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण जास्त वाढले आहे. अशा बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशीच घटना मुंबईनजीकच्या भाईंदरमध्ये घडली आहे. बेरोजगार तरुणाला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 10 लाखांचा गंडा घालणाऱ्याला भाईंदर उत्तन सागरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर अनेक पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित कुमार डे असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी बेरोजगार आणि गरजू तरुणांना सरकारी नोकरी म्हणजेच डीआरडीओ, नेव्ही, रेल्वे क्लर्क, तिकीट कलेक्टर इत्यादी ठिकाणी नोकरीच्या नावाखाली लाखो रुपये घेत होता. अजित कुमार डे याला ठाण्याच्या उत्तन येथून अटक करण्यात आली आहे. त्याने एका तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून 10 लाख रुपयांची फसवणूक केली होती.

आरोपी अजित कुमार डे याने फक्त एकाच तरुणाला फसवले नाही तर अशा अनेक गरजू तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवले आहे. त्याच्याविरोधात नवघर पोलीस ठाण्यात देखील 29 लाख रुपयांची फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तसंच त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. भाईंदर पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

दरम्यान, पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली तरुणांना 5 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या 12 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. संपूर्ण मुंबईत गेल्या 4 महिन्यांच्या काळात अशा प्रकारचे 170 पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले असून यातील तब्बल 50 पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी 10 लाखांपेक्षा अधिक रक्कमेची फसवणूक झाल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. सर्व मिळून ही फसवणुकीची रक्कम अंदाजे साडेपाच कोटीपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. आरोपींकडून पोलिसांनी 2 कॉम्प्युटर, 2 प्रिंटर, 3 लॅपटॉप, 1 सीसीटीव्ही कॅमेरा आणि 50 पेक्षा अधिक मोबाईल जप्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे-नारायण राणेंची निलम कंट्री येथे भेट

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

HD Revanna: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना एसआयटीने घेतलं ताब्यात

Prakash Ambedkar News | नेत्यांची भाषणं ऐकत प्रकाश आंबेडकरांनी मंचावरच डब्बा खाल्ला..

SCROLL FOR NEXT