Pune Cat News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : मांजर पाळण्यासाठी परवाना लागणार; महापालिकेच्या आरोग्य विभागाचा निर्णय

घरात मांजर पाळायचे असेल तर ही बातमी नक्की वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

पुणे - घरात मांजर पाळायचे असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण आता घरात मांजर पाळण्यासाठी पुणे (Pune) महापालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली असून, पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी ऑन- लाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. (Pune Latest News)

महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार मांजर, कुत्रा, घोडे अशा पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करून त्यासाठी रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र,आत्तापर्यंत केवळ कुत्रा आणि घोडे पाळण्यासाठीच परवानगी दिली जात होती.

आता मात्र मांजर पाळण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. प्रामुख्याने अनेकदा शेजारच्या घरात मांजर पाळल्याचा त्रास झाल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत असतात. काही ठिकाणी एका घरात दहा ते पधरा मांजरे पाळली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. पाळलेल्या मांजरीवरून झालेले वाद पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे कुर्त्यांप्रमाणे पाळीव मांजराची महापालिकेकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मांजराची नोंदणी करण्यासाठी 50 रुपये इतके वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे. यासोबतच रहिवासी पुरावा, लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो ही कागदपत्रे बंधनकारक असणार आहेत. तसेच दरवर्षी त्या परवान्याचे नूतनीकरण करून 50 रुपये परवाना शुल्कशिवाय अतिरिक्त 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिरपूर येथील दूध भेसळ प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस

Bhaubeej Special : प्रेम आणि नात्यांचा अनोखा उत्सव, वीटभट्टीवर कष्टकरी मजुरांनी साधेपणात साजरी केली भाऊबीज

Pune Nilesh Ghaywal Case: निलेश घायवळला मोठा झटका; पासपोर्ट अखेर रद्द

रिलसाठी तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून पेटवली; सेकंदातच स्फोट झाला, संपूर्ण जबडा फाटला

Gurukul Monitor POCSO Case: भयंकर! विद्यार्थ्याचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल; गुरुकुलात धक्कादायक प्रकार|VIDEO

SCROLL FOR NEXT