पुण्यात नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना 100 टक्के उपस्थितीची परवानगी; पाहा Video SaamTvNews
मुंबई/पुणे

पुण्यात नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना 100 टक्के उपस्थितीची परवानगी; पाहा Video

तसेच डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या भीमथडी जत्रेलादेखील परवानगी देण्यात आली आहे.

अमोल कविटकर, पुणे

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना (Covid-19) रूग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे शहरात कोरोना निर्बंधातून शिथिलता देण्यात येत आहे. आज झालेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजीत पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली त्यात त्यांनी गायन आणि इतर कार्यक्रमांना देण्यात आलेली 50 टक्के उपस्थितीची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. तसेच डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या भीमथडी जत्रेलादेखील परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना १०० टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे मराठी नाट्यसृष्टीला मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा नव्या ओमिक्रोम (Omicron)व्हेरिएंट आढळला आल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंडवडमधील जंम्बो कोविड (Jumbo Covid Center) रूग्णालय सुरूच ठेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री अजीत पवार यांनी दिली आहे, त्याचबरोबर त्याबाबतचा निर्णय 31 डिसेंबर रोजी घेतला जाईल, अशी माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कोरोनामुळे रखडलेले शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो काम सुरू झाले आहे. कोरोनामुळे त्याचं भुसंपादन बाकी होतं अशी माहिती अजीत पवार यांनी दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT