Nalasopara News Saam Tv News
मुंबई/पुणे

Nalasopara: परफ्युमच्या बाटल्यांचा तारखा बदलत होते, अचानक घरात झाला मोठा स्फोट

Nalasopara Gas Leak News: नालासोपारा पूर्वच्या शंकेश्वरनगरमधील एका इमारतीत परफ्युमच्या बाटल्यांच्या तारखा बदलण्याचे काम सुरू असताना स्फोट झालाय. यात एकाच कुटुंबातील ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Bhagyashree Kamble

नालासोपारा पूर्वच्या शंकेश्वरनगरमधील एका इमारतीत परफ्युमच्या बाटल्यांवरील तारखा बदलण्याचे काम सुरू असताना स्फोट झालाय. एक कुटुंब परफ्युम बाटलीवरील तारखा बदलण्याचं काम करीत होते. मात्र, अचानकपणे स्फोट झाला. यात घरातील ४ जण होरपळून जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. परफ्युममध्ये असलेल्या गॅसमुळे स्फोट झाल्याची माहिती आहे.

नालासोपारा पूर्वच्या शंकेश्वरनगरमधील एका इमारतीत ही धक्कादायक घटना घडली. याच ठिकाणी रोशनी अपार्टमेंट आहे. याच इमारतीच्या ११२ क्रमांकाच्या सदनिकेत वडर कुटुंब राहते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हे कुटुंब परफ्युम बाटलीवरील तारखा संपल्यामुळे बदलण्याचे काम करीत होते. याचदरम्यान अचानकपणे स्फोट झाला आणि एकाच कुटुंबातील ४ जण होरपळून जखमी झाले आहेत.

यात महावीर वडर(वय वर्ष ४१) सुनीता वडर, हर्षवर्धन वडर(वय वर्ष ९), हर्षदा वडर(वय वर्ष १४) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

मुलगा हर्षवर्धन याच्यावर नालासोपारा येथील खासगी रुग्णालय तर अन्य तीन जणांवर दुसर्‍या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणानंतर शेजारील नागरीक भयभीत झाले असून, परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेचा तपास केला जात असून, नेमका स्फोट कशामुळे झाला, अन्य काही कारण आहे का? याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT