Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

BDD चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - उद्धव ठाकरे

बीडीडी चाळीतील पोलिसांना बांधकाम दराने घरे मिळणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : नायगाव, एन एम जोशी आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला (BDD chawls redevelopment) गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी केले आहे. या चाळींमध्ये सन 2011 च्या आधीपासून पोलीस सेवा निवासस्थानात राहत असलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना बांधकाम दराने ही घरे देता यावीत, यासाठी गृहनिर्माण विभागाने (Department of housing) आवश्यक ती कार्यवाही करावी ,अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बीडीडी चाळ संदर्भात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये,गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सिताराम कुंटे,अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,प्रधान सचिव विकास खारगे,म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर,पोलीस आयुक्त संजय पांडे,पोलीस महासंचालक (गृहनिर्माण)फणसाळकर उपस्थित होते.त्याचबरोबर सुनिल शिंदे,आशिष चेंबुरकर,श्रद्धा जाधव हे स्थानिक लोकप्रतिनीधी उपस्थित होते.

वर्षानुवर्षे तिथे राहत असलेल्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा.बीडीडी चाळीत अनेक वर्षांपसून लोक राहात आहेत. या चाळींचा पुनर्विकास ही एक महत्वाकांक्षी योजना आहे.हे काम पुढे न्यायचे आहे.मात्र,पुनर्विकास करित असताना स्थानिकांचा सहानुभूतीपुर्वक विचार करण्यात यावा.या भागात उपलब्ध असलेल्या इतर घराच्या बाजार भावाच्या किंमतींपेक्षा कमी दराने त्यांना घरे मिळावीत, यासाठी गृहनिर्माण विभागाने विचार करावा असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस सेवा वसाहतीसाठी घरे देणार- डॉ. जितेंद्र आव्हाड

बीडीडी चाळीत सुमारे 2900 घरे ही पोलीस सेवा निवासस्थान आहेत. यापैकी 700 पोलीस निवासस्थाने (क्वार्टर्स) ही बीडीडी प्रकल्पात असतील तर उर्वरित 2200 घरे ही माहिम, वरळी ते दादर या परिसरात पोलीस सेवा वसाहतीसाठी दिले जातील, अशी माहिती आव्हाड यांनी यावेळी दिली.

बी.डी.डी. चाळीतील पोलीस सेवा निवासस्थानात 1 जाने 2011 पूर्वी राहत असणाऱ्या सेवानिवृत्त, मयत किंवा सेवेत असणाऱ्या पोलीसांना बांधकाम दराने (Construction Cost) दराने घरे मिळवित यासाठी प्रयत्न सुरु होते. या परिसरात किमान एक ते दिड कोटी रुपये एवढा दर असतांना विशेष बाब म्हणून सुमारे पन्नास लाख रुपयांना ही घरे त्यांना मिळावीत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. असेही आव्हाड यांनी सांगितले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT