Eknath SHinde
Eknath SHinde Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Advertisement News : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे! शिवसेनेच्या जाहिरातीनं फडणवीसांचं टेन्शन वाढवलं

प्रविण वाकचौरे

Munbai News : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आणि अनेक आमदार, खासदारांसह पक्षावरच हक्क मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या या राजकीय खेळीने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यावेळी भाजप-शिवसेना युतीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होती असे अंदाज असताना मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली.

मात्र तेव्हा एकनाथ शिंदे तात्पुरते मुख्यमंत्री असतील असेही अंदाज बांधले जात होते. मात्र या अंदाजांना छेद देणारी जाहिरात समोर आली आहे. त्यातून शिवसेना-भाजपची आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरली आहे की काय अशी दाट शक्यताही वर्तवली जात आहे. (Latest Marath News)

राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशा आशयाची पानभरुन जाहिरात आज सर्वच वृत्तपत्रांमध्ये छळकली आहे. एका सर्वेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्रितपणे केलेल्या कामाला राज्यातील जनतेने पसंती दिल्याचं समोर आलं आहे.

याच सर्वेचा आधार घेत शिवसेनेने सर्वच वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात दिली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जनतेची देंवेद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचाही उल्लेख या जाहितीत करण्यात आला आहे.  

काय आहे जाहिरातीमध्ये?

राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे, अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळालं आहे. (Political News)

मतदान सर्वेक्षणानुसार भारतीय जनता पक्षाला 30.2% आणि शिवसेनेला 16.2% जनतेने कौल दिला. म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4% जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणासाठी इच्छुक आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथजी शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांना 23.2% जनतेला मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 49.3% जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hit And Run Case: अल्पवयीन कारचालक दारू प्यायला होता की नाही?, रिपोर्टसाठी लागणार ८ दिवस

Tamil Nadu Shocking News: दुसऱ्या मजल्याच्या छतावर बाळ अडकलेच कसे? आई सोशल मीडियावर झाली ट्रोल, सहन न झाल्यानं स्वतःलाच संपवलं

Yeola Loksabha Election: सावरगाव आणि चिचोंडी खुर्दमधील केंद्रावरील EVMमध्ये बिघाड; तासाभरापासून मतदार ताटकळले

Nagpur Crime : नागपुरातील घरफोडीतील चोरटे ताब्यात, ३ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

SCROLL FOR NEXT