'उद्धव ठाकरेंच आसन डळमळीत करायचं काम पवारांनी राऊताना दिलंय' Saam TV
मुंबई/पुणे

'उद्धव ठाकरेंच आसन डळमळीत करायचं काम पवारांनी राऊताना दिलंय'

'हे १९ बंगल्याच प्रकरण काढत आहेत काढूद्या; पण हे प्रकरण सरकार घेऊन जाणार आहे, हे सरकार आता टिकत नाही.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. आज भाजपच्यावतीने नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. दादरमध्ये देखील भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या आंदोलनातील भाषणामध्ये त्यांनी राज्य सरकारवरती टीका केली आहे.

ते म्हणाले, ' राज्य यांच्याकडे आहे पण त्यांचाच गृहमंत्री आंदोलन करत आहे. आता पूर्वीची भाजप राहिली नाही गुन्हे कीतीही दाखल केले तरीही संघर्ष करणारी ही नवी भाजप असल्याचं ते म्हणाले. येत्या दोन दिवसात आणखी काही नेत्यांवर कारवाई हाईल, तसंच 93 च्या मुंबई बॉम्बस्फोचा प्रकरणात अहवाल पुढे यावा. तसे झालं तर जेलमध्ये जागा उरणार नाही, केंद्र सरकारला आवाहन करतो की तो अहवाल बाहेर काढावा असही पाटील यावेळी म्हणाले.

19 बंगल्यांच प्रकरण संजय राऊतांनी बाहेर काढलं आहे कारण त्यांना उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि मोतोश्रीला रडावर आणायचं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) शरद पवार यांच्या इशाऱ्याने काम करत आहेत. उद्धव ठाकरे ऐकत नाहीत म्हणून त्यांचं आसन डळमळीत करायच काम पवारांनी राऊताना दिलं आहे. हे १९ बंगल्याच प्रकरण काढत आहेत काढूद्या; पण हे प्रकरण सरकार घेऊन जाणार आहे, हे सरकार आता टिकत नाही. भाकितही पाटील यांनी केलं.

महिला अत्याचार, भ्रष्टाचार असे अनेक गुन्हे महाराष्ट्रातील मंत्र्यांकडून झाले. यात कमी होतो म्हणून कुटुंबातील लोक बॉंबस्फोटातील सहभाग असलेल्या लोकांशी नवाब मलिक यांचे संबंध पुढे आले आहेत.

अनिल परब (Anil Parab) बेकायदेशीर रिसॉर्ट बांधतात. हे सगळे कमी होत म्हणून मुंबई ब्लास्ट प्रकरणातील लोकांकडून जमिनी घेतल्या हा एकतेला धोका आहे. असं म्हणतच नवाब मलिक यांचा राजीनामा झाल्या शिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा देखील त्यांना यावेळी दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Year 2026 Horoscope: २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? वाचा संपूर्ण १२ राशींचं भविष्य

Yuzvendra Chahal: भारतीय खेळाडू युजवेंद्र चहलची तब्येत बिघडली; २ गंभीर आजारांची झालीये लागण

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आधी ४२०ची केस आता घर आणि रेस्टॉरंटवर इनकम टॅक्सचा छापा, पण...

Maharashtra : राष्ट्रवादीसोडून १४ जण भाजपच्या वाट्यावर, यादी पाहून अजित पवार नाराज; मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत

Special Railway Trains: ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त १३८ स्पेशल ट्रेन, ६५० फेऱ्या; रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT