Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : सर्वात मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर

ईडीने अटक केल्यानंतर १०१ दिवसांनी कोर्टानं त्यांना जामीन दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut Bail : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ईडीने अटक केल्यानंतर १०१ दिवसांनी कोर्टानं त्यांना जामीन दिला आहे. राऊत यांना मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. (Sanjay Raut Latest News)

सध्याच्या कसोटीच्या काळात संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. गेल्या १०० दिवसांपासून संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, आतापर्यंत पीएमएलए कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नव्हता.

त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. ईडीने केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता. अखेर आज कोर्टाने त्यांना आज जामीन मंजूर केला. दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळताच, शिवसैनिकांनी कोर्टाचे आभार मानले आहे. (Sanjay Raut News Today)

काय आहे प्रकरण?

मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालयाने (ईडी) संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. संजय राऊत आणि त्यांचे बंधू प्रविण राऊत हेच पत्राचाळ प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे ईडीनं लावलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा युक्तिवाद संजय राऊतांच्या वतीनं करण्यात आला होता.

दरम्यान 31 जुलैला अटक झाल्यापासून संजय राऊत हे कोठडीतच होते. सुरूवातीला ते ईडीच्या कोठडीत होते. मात्र, नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सध्या त्यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज या निकालाचे न्यायालयाकडून वाचन करण्यात आलं. त्यात कोर्टाने राऊत यांना जामीन मंजूर केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT