Nana Patole Saam TV
मुंबई/पुणे

पटोलेंच मुख्यमंत्र्यांना जाहीर पत्र; सत्ता स्थापना करतानाच्या आश्वासनांची केली आठवण

त्या वेळी काँग्रेस पक्षाच्या अखिल भारतीय अध्यक्ष मा. सोनियाजी गांधी यांच्या सूचनेनुसार प्रदेश काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.

सुमीत सावंत साम टीव्ही मुंबई

मुंबई : काँग्रेसने ज्या किमान समान कार्यक्रमासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्या कार्यक्रमाची आठवण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पत्राद्वारे करुन दिली आहे.

त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लिहलं आहे. 'सन 2019 मध्ये जातीयवादी शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करावी, असा प्रस्ताव पुढे आला. काँग्रेस (Congress) पक्षाच्या अखिल भारतीय अध्यक्ष मा. सोनियाजी गांधी यांच्या सूचनेनुसार प्रदेश काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या (सीएमपी) आधारे चालविण्याचे ठरले होते.

मागील 3 वर्षे कोरोनामुळे हा किमान समान कार्यक्रम राबविणे शक्य झाले नाही; परंतु आता कोरोनाची तीव्रता संपली आहे. त्यामुळे हा 'सीएमपी' पुन्हा राबविण्यात यावा. दलित, इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि अल्पसंख्याक यांच्या कल्याणासाठीच्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली जावी, अशी विनंती नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

मात्र हे पत्र पाठविण्यापेक्षा त्यांनी फोनवरती देखील चर्चा करता आली असती मात्र त्यांनी जाहीर पत्र लिहलं आहे तसच ते माध्यमांपर्यत देखील पोहचेल याची खातरजमा केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT