"काँग्रेसचे 25 ते 26 आमदार नाराज तर सेनेच्या आमदारांना निधीही मिळत नाही"

'शिवसेनेचे आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाही म्हणून नाराज आहेत'
MVA
MVASaam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Assembly By-Election) येत्या १२ तारखेला मदतान पार पडणार आहे. यासाठी सध्या कोल्हापूरात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि सतेज पाटील (Satej Patil) यांच्यात सध्या चांगलीच राजकीय टीका-टीप्पणी सुरु आहे. अशातच चंद्रकांत पाटील यांनी 'ताराराणी शहरात पहिला महिला आमदार व्हावी' असे बंटी पाटील म्हणतात मग त्यावेळी का नाही केला असा सवाल सतेज पाटलांना केला आहे.

तसंच करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी आक्रोश केला तरी त्याना न्याय मिळत नाही. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यापासून आपल्याला दोन मुलं असल्याचे म्हटलं आहे असंही ते म्हणाले. ताराराणी शहरात पहिला महिला आमदार व्हावी' असे बंटी पाटील म्हणतात मग त्यावेळी का नाही केला. 15 महिला आमच्या विधान सभेत आहेत तुमच्या किती आहेत. आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत आहोत कोल्हापूर पुरात आम्ही सर्वांन मदत केली. कोल्हापुरात भाजपचा आमदार येईल असा विश्वासही चंद्रकांत पाटील यावेळी व्यक्त केला.

हे देखील पहा -

दरम्यान, काँग्रेसचे (Congress) 25 ते 26 आमदार नाराज आहेत. शिवसेनेचे आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाही म्हणून नाराज आहेत राष्ट्रवादीचे आमदार असेल तरी चेहऱ्यावर दाखवत नाहीत. पण यांना सत्ता हवी म्हणून फेविकॉल सारखे चिकटले आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहूल गांधी हे द्रष्टे नेते असून २०२४ मध्ये राहुल गांधी पंतप्रधानपदी असतील असं ट्विट केलं आहे त्यांच्या या ट्विटवरती बोलताना ' स्वप्न बघायला हरकत नाही, नाना स्वप्न बघत आहेत' असा टोलाही पाटील यांनी लगावला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com