Rajesh Tope
Rajesh Tope Saam Tv
मुंबई/पुणे

Rajesh Tope: राज्यात 70 टक्के डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण- टोपे

वैदेही काणेकर, सामटीव्ही मुंबई

मुंबई: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक घेवून कोरोना परिस्थीतीचा आढावा घेतला. त्यात महाराष्ट्राच्या वतीने राजेश टोपे उपस्थीत होते. यात 8 मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडली. महाराष्ट्राबाबत (Maharashtra) सर्व गोष्टी लेखी पाठवल्या होत्या. लसीकरण हा सध्या एकमेव उपाय आपल्याकडे आहे. कोव्हक्सीन 40 लाख, 50 लाख कोविशील्ड उपलब्ध करून द्यावं ही मागणी केली पंतप्रधानांकडे (PM Narendra Modi) केली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. कोव्हक्सीनचा तुटवडा आहे.

नव्या लसीकरण धोरणामुळे अधिक साठ्याची मागणी केली आहे. ज्यांना लसीकरण नको आहे त्यांच्याकरिता केंद्र सरकारने उपाय योजना कराव्या ही मागणी केली. घरी अँटिजेंन टेस्ट करणाऱ्यांची माहिती नाही. मेडिकल दुकानदाराने ही माहिती FDA ला कळवावी म्हणजे हा डेटा मिळेल असे राजेश टोपे म्हणाले. अनेक राज्यांत वेगवेगळे व्हेरियंट आहेत. महाराष्ट्रात मात्र ओमिक्रॉनचे 1700 तर डेल्टाचे 2700 रुग्ण आढळले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात 70 टक्के डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आहेत त्यामुळे डेल्टा अजूनही गेलेला नाहिये.

ट्रिटमेंट पद्धतीसाठी केंद्रानं मार्गदर्शन करावं. कोविड खर्चाच्या काही बाबतीत तफावत आहे. खर्चाचे सुधारित दर केंद्रानं द्यावा ही मागणी केली आहे. उपाययोजना SOP द्यावी अशी मागणी टोपेंनी दिली आहे. आर्थिक नुकसान न होता सर्व गोष्टी कराव्या हे पंतप्रधानांनी सांगितलं आहे. पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंमुळे मुख्यमंत्री अनुपस्थित होते अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. सलग 2/3 तास त्यांना एका जागी बसणं शक्य नव्हतं. त्यामुळे लेखी पत्र देऊन मी महाराष्ट्राची बाजू मांडली. पंतप्रधानांनी 8 मुख्यमंत्र्यांना बोलू दिलं. मला प्रत्यक्ष बोलून बाजू मांडायची संधी मिळाली नाही. म्हणून आम्ही लेखी सादर केलं असेही राजेश टोपे म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डि-हायड्रेशन पासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT