Nawab Malik  SAAM TV
मुंबई/पुणे

''अँटिलीया अन् मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड परमबीर सिगं, हे सत्यचं''

दुसरीकडे परमबीर सिंग सांगतायत सचिन वाझेला (Sachin Waze) सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाने दबाव आणला.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: काल अनिल देशमुख यांनी ईडीसमोर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले होते की मनसुख हिरेन आणि अँटिलीया प्रकरणाचे मास्टरमाईंड परमबीर सिंग होते. त्यावर आता नवाब मलिक यांची प्रतिक्रिया आली आहे. ईडीच्या चार्जशीटच्या माध्यमातून हे समोर आले आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जे स्टेटमेंट दिलंय ते सत्य आहे. अँटालियाचे मास्टरमाईंड परमबीर सिंग आहेत. मनसुख हिरेन यांच्या हत्येमागेही परमबीर सिंग यांचाच हात असल्याचे मलिक म्हणाले आहेत. त्याचबरोबर एनआयए परमबीर सिंग (Parambir Singh) यांना वाचवत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

दुसरीकडे परमबीर सिंग सांगतायत सचिन वाझेला (Sachin Waze) सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाने दबाव आणला. पण हेच परमबीर आणि वाझे ठाण्यात एकत्र काम करत होते. सरकारकडून मान्यता देण्यात आली नसताना आणि सरकारकडून शिफारस नसताना वाझेला परमबीर सिंग यांनी सेवेत घेतले. वाझे निलंबित असताना ठाण्यात परमबीर सिंग यांच्याबरोबर वाझे काम करत असल्याते मलिक म्हणाले.

पुढे ते म्हणाले की हे सरकारला बदनाम करण्यासाठी केलं जात आहे. खोटे आरोप करून अनिल देशमुख आणि सरकारला बदनाम केलं जात आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना दाबण्याचं काम सुरू आहे. कितीही दबाव आणला तरी सरकार झुकत नाही म्हणून केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय. राज्यातील तीनही पक्षांचे नेते या दबावाला बळी पडणार नाहीत असे मलिक म्हणाले.

राज्यपालांचे खाजगी सचिव म्हणून निवृत्त झालेले उल्हास मुणगेकर यांची नियुक्ती केल्याप्रकरणीही नवाब मलिक यांनी टीका केली आहे. एखाद्या निवृत्त व्यक्तीला नियमित पदावर नियुक्त करता येत नाही. राजभवनातून ते आदेश जारी झाले आहेत. राज्यात हजारो अधिकारी आहेत, त्यातील अधिकारी नियुक्त करता आले असते. पण निवृत्त अधिकाऱ्याला नियुक्ती देण्याचा एवढा मोह का? असा प्रश्न मलिकांनी विचारला आहे. राज्यपाल १२ आमदारांची नियुक्ती, विद्यापीठ विधेयक यावर कायदेशीर सल्ला घेत आहेत. या विषयावरही त्यांनी कायदेशीर सल्ला घेतला पाहिजे असेही मलिक म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Rajgad Travel: मुंबईपासून राजगड किल्ल्यापर्यंत प्रवास कसा करावा? ट्रेकिंग आणि ट्रॅव्हल टिप्स जाणून घ्या

Maharashtra Live News Update: नवापूर तालुक्यातील खडकी आश्रम शाळेत एका सहा वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Maharashtra Rain: परतीच्या पावसाचा हाहाकार! आज पश्चिम महाराष्ट्राला झोडपणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Udgir Fort History: मध्ययुगीन युद्धभूमी आणि भव्य संरचना, उदगीर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

SCROLL FOR NEXT