परमबीर सिंग फरार? घोषित करण्याचा न्यायालयाने निर्णय राखला  Saam Tv
मुंबई/पुणे

परमबीर सिंग फरार? घोषित करण्याचा न्यायालयाने निर्णय राखला

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याविषयी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याविषयी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. परमबीर सिंग यांना फरार घोषित करायचे की नाही. यावर सुनावणी सुरू होती. अखेर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. गुन्हे शाखेतर्फे परमबीर सिंग यांना फरार आरोपी घोषित करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती.

हे देखील पहा-

परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यावर त्यांनी वाझे प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप करण्यात आले होते. यामध्ये देशमुखांना राजीनामा द्यावा लागला आहे. तर, परमबीर सिंग सध्या गायब झाले आहेत. ते कोर्टात देखील हजर नव्हते. काही दिवसाअगोदर त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. मात्र, काही प्रत्युत्तर न आल्यामुळे त्यांच्याविरोधामध्ये वॉरन्ट जारी करण्यात आले आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या वतीने मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश भाजीपाले यांच्यासमोर सुनावणी पार पडली आहे. सरकारी पक्षाने युक्तीवाद करत असताना वारंवार चौकशीचे समन्स बजावण्यात आल्याचे सांगितले आहे. परमबीरसिंग यांच्याविरोधामध्ये अजामीनपात्र अटक वॉरन्ट देखील जारी करण्यात आले आहे. मात्र, ते त्यांच्या कोणत्याही पत्त्यावर उपलब्ध नाही. आणि कोणत्याही चौकशीकरिता पोलिसांच्या संपर्कामध्ये नाहीत.

यामुळे या आरोपीला फरार घोषित करण्याची परवानगी मिळावी आणि खटल्यामधील पुढील चौकशीची सुरुवात करावी, अशी मागणी मांडण्यात आली, असे झाल्यास परमबीर सिंग यांच्या अन्य मालमत्तांवर जप्तीची कारवाई होऊ शकणार आहे. यासंदर्भात युक्तीवाद न्यायालयात झाल्यावर न्यायाधिशांनी निर्णय़ राखून ठेवण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

DIY Homemade Rakhi : घरीच बनवा या सुंदर राखी डिझाईन्स, रक्षाबंधनाचा सण होईल खास

Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

Kinetic DX EV: ४१ वर्षांनंतर कायनेटिक स्कूटर नव्या रंगात, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT