Mumbai Railway News Saam Tv
मुंबई/पुणे

लोकल प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! 'या' नव्या मार्गावर धावणार दररोज ५० लोकल; प्रवासाचा वेळ अर्धा होणार?

Panvel-Karjat Railway Project Update: पनवेल-कर्जत नव्या उपनगरी रेल्वेमार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. वर्षअखेरीस मार्ग सुरू होण्याची शक्यता असून पहिल्या टप्प्यात दररोज ४० ते ५० लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे.

Namdeo Kumbhar

Panvel-Karjat Latest News : पनवेल कर्जत रेल्वे मार्ग वर्षाअखेर सुरू होणार आहे. पनवेल-कर्जत हा नवा उपनगरीय रेल्वेमार्ग या वर्षाअखेरीस सुरु होण्याची शक्यता आहे. या रेल्वे मार्गिकेचे 99 टक्के काम पूर्ण झालंय... पहिल्या टप्प्यात या मार्गावर दररोज ५० लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे नवी मुंबई आणि रायगड परिसरातील प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे.

'मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३' (MUTP-3) अंतर्गत पनवेल-कर्जत नवीन दुहेरी उपनगरी रेल्वेमार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पाचे जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले असून चालू वर्षाच्या अखेरपर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. या नवीन रेल्वेमार्ग सुरू झाल्यानंतर नवी मुंबई, पनवेल, चौक आणि कर्जत परिसरातील प्रवाशांना उपनगरी रेल्वेचा जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. रस्ते प्रवासाच्या तुलनेत हा प्रवास अत्यंत स्वस्त आणि जलद ठरणार असून प्रवाशांचा बहुमोल वेळ वाचणार आहे.

कामांची सध्याची स्थिती

या मार्गावरील २ मोठे पूल, ३५ लहान पूल आणि ५ उड्डाणपुलांपैकी १५ उड्डाणपुलांचे काम ९९% पूर्ण झाले आहे. कर्जतमधील उड्डाणपूल पूर्ण झाला आहे.

६.७० किमी लांबीच्या ३ भुयारी मार्गांचे (बोगदे) खोदकाम आणि अस्तरकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच पनवेल, मोहोपे, चिखले, चौक या स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

२९.६ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर २९.७० किलोमीटर रुळांची जोडणी पूर्ण झाली आहे.

पहिल्या टप्प्यात दररोज ५० फेऱ्या

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात या मार्गावर रोज सुमारे ४० ते ५० लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे. प्रवाशांची वाढती मागणी आणि प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील टप्प्यात वातानुकूलित (AC) लोकल फेऱ्या सुरू करण्याचा विचार केला जाईल. या प्रकल्पामुळे बदलापूर, अंबरनाथ मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. सुमारे २ हजार ८७२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई आणि नवी मुंबईचा थेट संपर्क अधिक मजबूत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: शिंदेंनी माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी घेतले, मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा; म्हणाले - 'माझ्याकडे पुरावे...'

How to dry wet salt: मिठाला पाणी सुटलंय का? ही ट्रिक वापरा, मिनिटात होईल सुटसुटीत

Maharashtra News Live Update: भगवान भक्तीगडावरून पंकजा मुंडे दसरा मेळाव्यासाठी उपस्थित

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे ३२ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

५०० रुपयांचा चष्मा घातल्याशिवाय दिसत नाहीत; अंबरनाथचे तहसीलदार म्हणजे ‘मिस्टर इंडिया, बैलगाडीसह थेट कार्यालयात धडक

SCROLL FOR NEXT