Mumbai Crime: पनवेल येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 6 जणींची सुटका Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: पनवेल येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 6 जणींची सुटका

मुंबईनजीक असणाऱ्या पनवेल येथील खंडेश्वर पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईनजीक असणाऱ्या पनवेल येथील खंडेश्वर पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Sex racket exposed) केला आहे. या छापेमारीमध्ये पोलिसांनी पीडित तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना अटक (arrested) करण्यात आली आहे. तसेच एकूण ६ जणींची सुटका केली आहे. संबंधित आरोपी परराज्यातील रहिवासी असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी (police) आरोपींना (accused) न्यायालयात (court) हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास खंडेश्वर पोलीस (police) करत आहेत.

हे देखील पहा-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल (Panvel) येथील खन्दा कॉलनी परिसरामधील एका इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू होता. याठिकाणी काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई (Mumbai) गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संबंधित ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये पोलिसांनी २ दलालांना अटक करण्यात आले आहे. ६ तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

संबंधित तरुणींना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), राज्यस्थान, आगरा आणि दिल्ली (Delhi) परिसरामधील विविध ठिकाणाहून आणल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. संबंधित तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात आहे. आरोपी तरुण हे पीडित तरुणींचे फोटो ग्राहकांना पाठवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होते. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली जात होती. ज्यामधून आरोपींना कमीशन मिळत होते. आरोपींकडून पीडित मुलीच्या शरीराचा रोज सौदा केला जात होता.

या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यावर खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापेमारी करत ६ तरुणींची सुटका करण्यात आली आहे. त्यांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी बिहार तर दुसरा आरोपी उत्तर प्रदेश मधील रहिवासी आहे. या सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

Maharashtra Tourism: नैसर्गिक सौंदर्य अन् नयनरम्य परिसर... धुळे जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं कधी पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT